IPL Player Retention : कुठल्या खेळाडूंना कायम ठेवायचं यावरून मुंबई इंडियन्स संघासमोर पेच

IPL Player Retention : मुंबई इंडियन्सकडे स्टार खेळाडूंचा ताफा आहे. 

138
IPL Player Retention : कुठल्या खेळाडूंना कायम ठेवायचं यावरून मुंबई इंडियन्स संघासमोर पेच
  • ऋजुता लुकतुके

संघ मालकांच्या विनंतीवरूनच बीसीसीआय (BCCI) यंदा फ्रँचाईजींना पाच खेळाडू आपल्याकडे राखण्याची परवानगी देऊ शकते. पण, तरीही मुंबई इंडियन्स संघाच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. याचं कारण, ५ खेळाडूंपैकी फक्त ३ भारतीय असू शकतात अशी दाट शक्यता आहे. तसं झालं तर रोहित, हार्दिक, सूर्यकुमार आणि बुमरा यांच्यापैकी कुठल्या तिघांना कायम राखायचं आणि कुणाला जाऊ द्यायचं हा प्रश्न मुंबई इंडियन्ससमोर आहे. ५ खेळाडूंना कायम ठेवायला दिलं तर राईट-टू-मॅचचा नियम रद्द होणार अशीच आता चर्चा आहे. (IPL Player Retention)

जर आयपीएल २०२५ साठी फक्त तीन भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम निश्चित झाला. तर मुंबई इंडियन्ससाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मुंबईकडे अनेक स्टार भारतीय खेळाडू आहेत. पण संघ त्यांच्यापैकी फक्त तीनच खेळाडूंना कायम ठेवू शकेल. मुंबई फ्रँचाईजीकडे कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्या रूपात चार दिग्गज खेळाडू आहेत, जे स्वतः मॅच विनर आहेत. मात्र, तीन भारतीय खेळाडूंच्या नियमामुळे त्यापैकी एकाला मुंबई इंडियन्सला सोडावे लागू शकते. (IPL Player Retention)

(हेही वाचा – Central Govt ने स्थायी समित्या केल्या स्थापन; BJP ११ समित्यांचे अध्यक्षपद भूषवणार)

अशा स्थितीत मुंबई इंडियन्ससमोर चार बड्या खेळाडूंपैकी कोणतेही तीन खेळाडू निवडण्याचे आव्हान असेल. मुंबई, भारतीय संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना सोडण्याची चूक करणार नाही, कारण या दोन्ही खेळाडूंसाठी बदली शोधणे कठीण आहे, मेगा लिलावात त्यांना परत खरेदी करता येण्याची शक्यता कमीच आहे. या कारणास्तव मुंबई इंडियन्स या दोघांना कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यापैकी एकालाच त्यांना कायम ठेवता येणार आहे. (IPL Player Retention)

गेल्या हंगामाच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते आणि तो एमआय व्यवस्थापनावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत रोहित स्वत: संघ सोडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हार्दिक कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही गेल्या हंगामात कमी पडला होता. हे पाहता, दोघांपैकी कुणाला जाऊ द्यायचं हे ठरवणं जिकिरीचं असणार आहे. (IPL Player Retention)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.