- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या (IPL) बाद फेरीची ऑनलाईन तिकीट विक्री १४ मे पासून सुरू झाली आहे. बीसीसीआयने तशी अधिकृत घोषणा केली असून पेटीएम हे तिकीट विक्रीचे अधिकृत पार्टनर आहेत. त्यामुळे आयपीएलची वेबसाईट https://www.iplt20.com तसंच पेटीएम ॲप या ठिकाणी तिकिटं उपलब्ध झाली आहेत. तुमच्याकडे रुपे कार्ड असेल तर तुम्हाला पहिली क्वालिफायर (२१ मे), दुसरी क्वालिफायर (२४ मे) तसंच एलिमीनेटर (२२ मे) या सामन्यांची तिकिटं एक दिवस आधी मिळू शकणार आहेत. तर चेन्नईला २६ मे ला होणाऱ्या अंतिम फेरीची तिकिटंही रुपे कार्डधारकांना एक दिवस आधी मिळू शकतील. (IPL Playoffs)
स्पर्धेची पहिली क्वालिफायर आणि एलिमीनेटर हे सामने अनुक्रमे २१ आणि २२ मे ला अहमदाबाद इथं होणार आहेत. तर दुसरी क्वालिफायर आणि अंतिम फेरी २४ आणि २६ मे ला चेन्नईत होणार आहे. (IPL Playoffs)
इतर लोकांसाठी हीच तिकीट विक्री १५ मे पासून सुरू होत आहे. तिकीट विक्रीचं वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. (IPL Playoffs)
(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : दोषींवर कठोर कारवाई करण्याची रमेश चेन्नीथला यांची मागणी)
ही सर्व प्रकारची तिकिटं आयपीएलची अधिकृत वेबसाईट, पेटीएम ॲप आणि www.insider.in या वेबसाईटवर मिळू शकतील. १४ मे ला संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून विक्री सुरू होईल. (IPL Playoffs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community