गेल्या वर्षी कोरोनामुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर खेळवण्यात आले होते, यंदाच्या वर्षी आयपीएलचा सीजन ज्या काळात आयोजित केला, त्यापासूनच भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु झाला होता, मात्र तरीही हे सामने भारतामध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे प्रेक्षकांविना हे सामने खेळवले जाऊ लागले, तरीही अखेरीस यामध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण होऊ लागल्यावर अखेर आयपीएलचे सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी जाहीर केला.
कोणत्या क्रिकेटपटूंना झाली कोरोनाची लागण?
सोमवारी, ४ मे रोजी जेव्हा क्रिकेटपटूंची टेस्ट करण्यात आली, तेव्हा तब्बल 10 क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याआधी चेन्नई सुपर किंगचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनर यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि आता सोमवारी, ४ एप्रिल रोजी एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 क्रिकेटपटूंना कोरोनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.
Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021
सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण!
सध्या आयपीएलचे अर्धे सामने पूर्ण झाले आहेत, आता आयपीएलमधील उर्वरित सामने कधी घेण्यात येतील याबाबत आयपीएलकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आरसीबी विरुद्ध केकेआर हा सामना आधीच रद्द झाला होता. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांना कोरोनाची लागण झाली. आता आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
(हेही वाचा : पोलिस दलातही कोरोनाचे थैमान… मृतांचा आकडा वाढला)
मुंबई उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. कोरोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी, असा आदेश बीसीसीआयला द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो, असेही याचिकाकर्त्याने म्हटले. न्यायालयाने याची दाखल घेत यावरील पुढील सुनावणी गुरुवारी, ६ मे पर्यंत स्थगित करण्यात आलो.
Join Our WhatsApp Community