IPL Retentions : क्लासेन, कोहलीपासून करोडो रुपयांना कायम ठेवलेले १० आयपीएल स्टार

IPL Retentions : सनरायझर्स हैद्राबादने क्लासेनला विक्रमी २४ कोटी रुपये देऊन ठेवून घेतलं आहे. 

34
IPL Retentions : क्लासेन, कोहलीपासून करोडो रुपयांना कायम ठेवलेले १० आयपीएल स्टार
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये पुढील हंगामासाठी संघांनी कुठले खेळाडू राखून ठेवले याची यादी आता जाहीर झाले आहेत. दहा संघांकडे १२० कोटी रुपये होते. त्यातील काही पैसे खेळाडूंना कायम करण्यासाठी वापरून उरलेले पैसे संघांना खेळाडूंच्या मेगा लिलावात वापरता येणार आहेत. पण, खेळाडूंना कायम ठेवण्यासठीही संघांना बरीच रक्कम मोजावी लागली आहे. सर्वाधिक पैसे मोजले आहेत ते सनरायझर्स हैद्राबादने हेनरिक क्लासेनवर. तर सहाही खेळाडूंना मिळून मुंबई इंडियन्सने ७६ कोटी रुपये मोजले आहेत. खेळाडूंना कायम ठेवताना कुठल्या खेळाडूवर सगळ्यात जास्त पैसे मोजले ते बघूया,

हेनरिक क्लासेन (सनरायझर्स हैद्राबाद) – २३ कोटी रु आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमत मोजून हैद्राबाद संघाने आपल्याकडे कायम ठेवलं आहे. क्लासेनने विराट कोहलीचा १७ कोटी रुपयांचा विक्रमही मोडला आहे.

विराट कोहली, निकोलस पूरन (२१ कोटी रु) – विराट कोहलीसाठी बंगळुरू आणि पूरनसाठी कोलकाता फ्रँचाईजींनी २१ कोटी रुपये मोजले आहेत. विराट कोहली बंगळुरू संघाचं नेतृत्वही करणार आहे. (IPL Retentions)

(हेही वाचा – IPL Retentions : मुंबई इंडियन्सनी हार्दिकला फक्त कायमच नाही ठेवलं तर दिली ‘ही’ जबाबदारी)

पॅट कमिन्स (सनरायझर्स हैद्राबाद), संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स), रशिद खान (गुजरात टायटन्स), जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स), ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा (चेन्नई सुपरकिंग्ज) या खेळांडूंना त्यांच्या फ्रँचाईजींनी १८ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं आहे

पंजाब किंग्ज संघाने शशांक सिंग (५.५ कोटी) आणि प्रभसिमरन सिंग (४ कोटी) या दोनच खेळाडूंना राखून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांनी १२० कोटींपैकी फक्त ९.५ कोटी रुपये वापरले आहेत. उर्वरित ११.५ कोटी रुपये त्यांच्याकडे लिलावासाठी शिल्लक आहेत. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिंकू सिंग, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती या सहा खेळाडूंना कायम ठेवून आपला पूर्ण कोटा वापरला आहे. तर मुंबई इंडियन्सनी चार खेळाडू राखताना ७६ कोटी रुपये त्यासाठी वापरले आहेत. (IPL Retentions)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या केदार दिघेंना नेटकऱ्यांनी ठोकले!)

संघ मालकांना राईट-टू-मॅच च्या अधिकारासह एकूण सहा खेळाडूंना आपल्याकडे कायम राखता येईल. आणि गुरुवारी खेळाडूंची यादी जाहीर झाल्यावर उर्वरित खेळाडूंसाठी संघ मालक राईट-टू-मॅच कार्ड वापरू शकतील. म्हणजेच लिलावात त्या खेळाडूंवर जितकी सर्वाधिक बोली लागेल तेवढे पैसे द्यायची तयारी तो खेळाडू सध्या असलेल्या संघाने ठेवली तर त्यांना राईट-टू-मॅच कार्ड वापरून त्या खेळाडूला कायम ठेवता येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.