IPL Retentions : मुंबई इंडियन्सनी हार्दिकला फक्त कायमच नाही ठेवलं तर दिली ‘ही’ जबाबदारी

IPL Retentions : पुढील वर्षीही हार्दिक पांड्याच संघाचा कर्णधार राहणार असं आकाश अंबानींनी स्पष्ट केलं. 

49
IPL Retentions : मुंबई इंडियन्सनी हार्दिकला फक्त कायमच नाही ठेवलं तर दिली 'ही' जबाबदारी
  • ऋजुता लुकतुके

पुढील हंगामासाठी फ्रँचाईजी मालक कुठल्या खेळाडूंना कायम ठेवणार त्याची यादी आता सादर झाली आहे. त्यानुसार, मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा या खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवलं आहे. तर इशान किशन या आतापर्यंत संघातील महत्त्वाच्या खेळाडूला सोडून दिलं आहे. मुंबई इंडियन्सकडे भारतातील महत्त्वाचे खेळाडू होते. त्यामुळे ते नेमकं कुणाला ठेवतात आणि त्यासाठी किती पैसे खर्च करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. त्यानुसार, उपलब्ध १२० कोटी रुपयांपैकी ७५ कोटी रुपये खर्चून मुंबई इंडियन्सनी वरील खेळाडूंना कायम केलं आहे. तर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लिलावासाठी त्यांच्याकडे आता ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत. (IPL Retentions)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघाने सलग दुसऱ्या वर्षी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. गेल्यावर्षी हार्दिकच्या कप्तानीखाली मुंबईचा संघ तळाला राहिला होता. तर हार्दिकवरही रोहितला बाजूला सारून कप्तानी दिली गेल्यामुळे चाहत्यांनी राग काढला. भर मैदानात अनेक मैदानांवर हार्दिकची जाहीर हूर्यो करण्यात आली. त्यामुळे यंदा सूर्यकुमारवर कप्तानीसाठी विश्वास दाखवला जाईल असं बोललं जात होतं. (IPL Retentions)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : वर्षा गायकवाड विरोधातील बाँब अखेर फुटलाच)

पण, संघाचे मालक आकाश अंबानी यांनी हार्दिक पांड्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. ‘पाच खेळाडू ज्यांनी मुंबई इंडियन्सला हे यश मिळवून दिलं त्यांना कायम राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हे पाच खेळाडू म्हणजे आमची मूठ आहे. ही प्रक्रिया मनासारखी झाल्यामुळे मी खुश आहे. हार्दिकला गेल्या हंगामात यश मिळालं नसलं तरी सगळ्यांचाच त्याच्यावर विश्वास आहे,’ असं आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. तर रोहितने टी-२० मधून सन्यास घेतल्यानंतरही मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (IPL Retentions)

यंदाचा हंगाम हार्दिकला खेळाडू आणि कप्तान म्हणूनही वाईट गेला होता. त्याने १४८ च्या स्ट्राईक रेटने २१३ धावा केल्या. आणि षटकामागे १०.७५ धावा मोजत त्याने ११ बळी घेतले. त्याचबरोबर चाहत्यांचा लाडका कर्णधार रोहित शर्माला कप्तानीवरून हटवून ती हार्दिककडे सोपवल्यामुळे चाहतेही हार्दिकवर नाराज झाले. शिवाय हार्दिक ऐनवेळी खेळाडूंच्या देवाणघेवाणीच्या बाहेर गुजरातकडून ऐनवेळी मुंबईकडे आला होता. ती गोष्टही अनेकांना रुचली नव्हती. (IPL Retentions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.