IPL Retentions : विराट कोहलीच बंगळुरू फ्रँचाईजीचा कर्णधार

IPL Retentions : बंगळुरू फ्रँचाईजीने विराटला कायम ठेवतानाच त्याच्यावर पुन्हा कप्तानीची जबाबदारी सोपवली आहे. 

80
IPL Retentions : विराट कोहलीच बंगळुरू फ्रँचाईजीचा कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुढील वर्षासाठी विराट कोहलीला २१ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं आहे. इतकंच नाही तर त्याच्यावर नवीन हंगामासाठी कप्तानपदही सोपवण्यात आलं आहे. अलीकडेच संघ प्रशासनाचं विराटशी बोलणं झालं आहे. आणि त्याने संघाची गरज ओळखून ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. गेल्या हंगामापासून बंगळुरूकडे कर्णधार नाही. ४० वर्षीय फाफ दू प्लेसिसने या हंगामात कप्तानी केली होती. पण, तो यंदा संघात कायम ठेवण्यात आलेला नाही. तर त्याचं वयही आता सरलं आहे. आधीचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने आधीच निवृत्ती स्वीकारली आहे. (IPL Retentions)

अशावेळी नेतृत्वातील पोकळी भरून काढण्यासाठी विराटने तत्परतेनं संघाला साथ देऊ केली आहे. नोव्हेंबर महिन्यात मेगा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी कुठल्या खेळाडूंवर लिलावात बोली लावायची हे ठरवण्यासाठी कर्णधाराची नियुक्ती आधी होणं गरजेचं आहे. ते लक्षात घेऊन संघ प्रशासनाने आधीच विराटशी बोलणी केली आहेत. (IPL Retentions)

(हेही वाचा – वन नेशन, वन इलेक्शन, UCC कधी लागू होणार? PM Narendra Modi यांनी दिले संकेत)

२०१३ ते २०२१ पर्यंत विराट कोहलीने बंगळुरू संघाचं नेतृत्व केलं. पण, त्यानंतर राष्ट्रीय संघातही विराटची कामगिरी खालावली होती. तिथेही नेतृत्व हळू हळू रोहित शर्माकडे जाताना दिसत होतं. अशावेळी विराटने २०२१ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नेतृत्व सोडत असल्याची घोषणा केली. तेव्हापासून दिनेश कार्तिक, एबी डिव्हिलिअर्स, फाफ दू प्लेसिस यांनी संघाचं नेतृत्व केलं आहे. (IPL Retentions)

विराट संघाचा कर्णधार नसला तरी तो संघाच्या निर्णय प्रक्रियेत कायम सकारात्मक असतो. आताही संघाची गरज बघून तो पुढे झाला आहे. बंगळुरू संघाने शुभमन गिल आणि रिषभ पंत यांच्याशीही कप्तानीसाठी बोलणी केली आणि त्यांना संघात घेण्याचे प्रयत्न केले. आतापर्यंत ते सफल झालेले नाहीत. तर शुभमनला गुजरात संघाने कायम राखलं आहे. आता लिलावात बंगळुरू संघ रिषभ पंतसाठी बोली लावेल असं बोललं जातंय. (IPL Retentions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.