- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या पुढील हंगामासाठी कोणत्या खेळाडूंना संघांनी कायम ठेवलंय यावरील पडदा आता हटला आहे. लीगमधील दहाही संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटी रुपये देऊन आपल्याकडे ठेवलं आहे. पण, पुढील हंगामासाठी राखून ठेवलेला तो सगळ्यात महागडा खेळाडू नाही. तो मान सनरायझर्स हैद्राबादच्या हेनरिक क्लासेनकडे गेला आहे. क्लासेनसाठी हैद्राबाद संघाने २४ कोटी रुपये इतकी किंमत मोजली आहे. क्लासेनने यंदा विराटचा १७ कोटी रुपयांचा विक्रम मोडला आहे.
अपेक्षेप्रमाणेच रिषभ पंत, के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना त्यांच्या फ्रंचाईजींनी कायम ठेवलेलं नाही. त्यामुळे हे तिघं लिलावाच्या फेऱ्यातून जातील. महेंद्रसिंग धोनीला अननुभवी खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयांत कायम ठेवण्यात आलंय. तर मुंबई इंडियन्सनी इशान किशनला सोडलं आहे. (IPL Retentions)
(हेही वाचा – Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन)
सर्व संघांनी कायम ठेवलेली खेळाडूंची यादी पाहूया,
मुंबई इंडियन्स – जसप्रीत बुमराह (१८ कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), हार्दिक पांड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), तिलक वर्मा (८ कोटी रु)
सनरायझर्स हैद्राबाद – हेनरिक क्लासेन (२४ कोटी रुपये), पॅट कमिन्स (१८ कोटी रु), अभिषेक शर्मा (१४ कोटी), ट्रेव्हिस हेड (१४ कोटी), नितिश कुमार रेड्डी (६ कोटी)
लखनौ सुपरजायंट्स – निकोलस पूरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयांक यादव (११ कोटी), मोहसीन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी)
पंजाब किंग्ज – शशांक सिंग (५.५ कोटी), प्रभसिमरन सिंग (४ कोटी),
(हेही वाचा – India-China संबंध निवळले, वादग्रस्त भागातून सैन्याने घेतली माघार )
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जयस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), शिमरॉन हेटमेयर (११ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथिषा पथिराणा (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रवींद्र जडेजा (१८ कोटी), महेंद्रसिंग धोनी (४ कोटी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटिदार (११ कोटी), यश दयाल (६ कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स – रिंकू सिंग (१३ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमणदीप सिंग (४ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी)
दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल (१६.५ कोटी), कुलदीप यादव (१३.२५ कोटी), ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी)
गुजरात टायटन्स – राशिद खान (१८ कोटी), शुभमन गिल (१६.२५), साई सुदर्शन (८.५ कोटी), राहुल टेवाटिया (४ कोटी), शाहरुख खान (४ कोटी) (IPL Retentions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community