आयपीएलमध्ये सुरुवातीपासून असलेला एक संघ सनरायजर्स हैद्राबादने मुख्य प्रशिक्षक पदावर न्यूझीलंड संघाचे माजी फिरकी गोलंदाज डॅनिेल व्हिटोरी यांनी नियुक्ती केली आहे. या हंगामातील खराब कामगिरीनंतर त्यांनी ब्रायन लाराची या पदावरून हकालपट्टी केली आहे.
व्हेटोरी यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचं प्रशिक्षक पद सांभाळलेलं आहे. तसंच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही ते प्रशिक्षक होते.
🚨Announcement🚨
Kiwi legend Daniel Vettori joins the #OrangeArmy as Head Coach🧡
Welcome, coach! 🔥 pic.twitter.com/2wXd8B1T86
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2023
सनरायजर्स संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या बदलाची घोषणा केली आहे. ब्रायन लारा सनरायजर्स संघाशी आधी फलंदाजीचे प्रशिक्षक आणि मग मुख्य प्रशिक्षक अशा भूमिकेतून मागची दोन वर्षं जोडलेले होते. पण, या कालावधीत सनरायजर्स संघावर तळाशी राहण्याची नामुष्की दोनदा ओढवली.
ताज्या हंगामातही 14 पैकी फक्त 4 सामने संघाला जिंकता आले. त्यामुळे संघ प्रशासनाने हा निर्णय घेतलेला दिसतोय. ही घोषणाही सनरायजर्स संघाने ट्विटरवरच केली होती.
As our 2 year association with Brian Lara comes to an end, we bid adieu to him 🧡
Thank you for the contributions to the Sunrisers. We wish you all the best for your future endeavours 🙌 pic.twitter.com/nEp95pNznT
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2023
ट्विटरवरील आपल्या संदेशात संघ प्रशासनाने म्हटलंय की, ‘ब्रायन लारा यांच्याबरोबरचा दोन वर्षांचा कार्यकाळ आज संपत आहे. सनरायजर्ससाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लारा यांना शुभेच्छा!’
मागच्या सहा हंगामात सनरायजर्स संघाचे व्हिटोरी हे चौथे मुख्य प्रशिक्षक आहेत. नवीन हंगामात ते कामाची सूत्र हाती घेतील.
Join Our WhatsApp Community