-
ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश यंदा पाकिस्तान सुपर लीग सोडून ऐनवेळी आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयाबद्दल आता त्याने पाकिस्तान लीग आणि पाक जनतेची माफी मागितली आहे. त्यासाठी एक पत्रकही त्याने जारी केलं आहे. ‘पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेण्याच्या निर्णयामुळे मलाच खूप वाईट वाटलं आहे. मी पाकिस्तान क्रिकेट आणि पेशावर झाल्मी या माझ्या फ्रँचाईजीच्या चाहता वर्गाचा अपराधी आहे. मला या निर्णयाचं खूप वाईट वाटत आहे,’ असं बॉशने म्हटलं आहे. (IPL vs PSL)
त्याचवेळी पीएसएल आणि आयपीएलचे सामने एकाच वेळी सुरू असल्यामुळे टीव्ही प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यासाठी पाकिस्तानवर सामन्यांच्या वेळा बदलण्याची नामुष्कीही ओढवली आहे. आता पीएसएलचे सामने रात्री आठ वाजता सुरू होणार आहेत. (IPL vs PSL)
(हेही वाचा – Virat Kohli vs Rajat Patidar : दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहली रजत पाटिदारवर नाराज आहे का?)
सुरुवातीला कॉर्बिन बॉश पाकिस्तान सुपर लीगच्या पेशावर फ्रँचाईजीसाठी डायमंड श्रेणीच्या करारात करारबद्ध झाला होता. पण, त्यानंतर आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. लिझाड विल्यम्स दुखापतग्रस्त झाल्यावर त्याला मुंबईकडून विचारणा झाली. बॉशने आयपीएलचा पर्याय ऐनवेळी निवडला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बॉशवर कारवाई करताना त्याच्यावर पीएसएलमधून एक वर्षासाठी बंदी लादली आहे. (IPL vs PSL)
हा बंदीचा निर्णय आपण स्वीकारत असल्याचं बॉशने आता स्पष्ट केलं आहे. ‘मी जसा वागलो, त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. माझ्यामुळे पेशावर फ्रँचाईजाला त्रास झाला हे मला मान्य आहे. त्यामुळे मी त्यांचा अपराधी आहे. शिवाय मी चाहत्यांचं मन मोडलं आहे. त्याचं मला कायम वाईट वाटत राहील,’ असं पुढे कॉर्बिन बॉश म्हणतो. (IPL vs PSL)
(हेही वाचा – ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार)
यंदा भारतातील आयपीएल आणि पाकिस्तानमधील पाकिस्तान सुपर लीग या दोन स्पर्धा एकाच वेळी होत आहेत. त्यातून असे काही प्रसंग उद्भवले आहेत. अर्थात, आयपीएलचं आर्थिक गणित मोठं असल्यामुळे अनेकांनी आयपीएललाच आपली पहिली पसंती देत आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल एकाच वेळी सुरू असल्यामुळे पाकिस्तानला पीएसएलच्या वेळाही बदलाव्या लागल्या आहेत. (IPL vs PSL)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community