-
ऋजुता लुकतुके
इराणी चषकाच्या अंतिम फेरीत दुसऱ्या दिवशी मुंबई संघाने ९ बाद ५३६ अशी मजबूत मजल मारली आहे. ३ बाद ३७ वरून संघाचा डाव सुरुवातीला सावरला तो कर्णधार अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane). त्याने आधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि त्यानंतर सर्फराझ खानबरोबर (Sarfaraz Khan) शतकी भागिदारी रचल्या आणि मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. यात अजिंक्य स्वत: ९७ धावांवर बाद झाला. तर सर्फऱाझ २२१ धावा करत मुंबईला ५०० च्या पार घेऊन गेला. (Irani Cup 2024)
(हेही वाचा- संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांना Israel मध्ये प्रवेशबंदी)
अजिंक्यने सर्फराझबरोबर तेव्हा १३१ धावांची भक्कम भागिदारी रचली होती. इतक्यात यश दयालच्या एका बाऊन्सरने त्याला चकवलं. ज्या पद्धतीने तो बाद झाला त्याची चर्चा दिवसभर होत राहिली. डावखुरा तेज गोलंदाज यशने अगदी अजिंक्या शरीराचा वेध घेणारा बाऊन्सर टाकला होता. सुरुवातीला अजिंक्यने तो खेळण्याचाच पवित्रा घेतला. पण, अचानक त्याने मन बदललं. त्याने चेंडू सोडून देण्याचं ठरवलं. पण, तसं करताना चेंडू बॅटला लागलाच. यष्टीरक्षकाकडे उडाला. अजिंक्यचं शतक ३ धावांनी हुकलं. जानेवारी २०२३ पासून अजिंक्यने शतक ठोकलेलं नाही. (Irani Cup 2024)
Ajinkya Rahane misses out on his 100!
He walks back for 97. A brilliant innings under pressure 👏
A very good review from Ruturaj Gaikwad & Co. as Yash Dayal breaks the 131-run stand 👌#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/gKLlMvwmaz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 2, 2024
चेंडू अजिंक्यच्या ग्लव्हजना लागून उडाला. आधी पंचांनी अजिंक्यला नाबाद ठरवलं होतं. पण, शेष भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू ग्लव्हजना लागल्याचं स्पष्ट झालं. अजिंक्य बाद झाला असला तरी तोपर्यंत त्याने मुंबईला सुस्थितीत पोहोचवलं होतं. दिवसअखेर सर्फराझने द्विशतक झळकावत मुंबईला पाचशे पार नेलं आहे. (Irani Cup 2024)
(हेही वाचा- Israeli Embassy in India : भारतातील इस्त्रायली दूतावासाच्या सुरक्षेत वाढ, इस्त्रायल- इराण तणावाची पार्श्वभूमी)
मागच्या २४ वर्षांत मुंबईने एकदाही इराणी चषक जिंकलेला नाही. यंदा संघाला तशी चांगली संधी आहे. तर अजिंक्यला आपला गेलेला फॉर्मही परत मिळवायचा आहे. (Irani Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community