Irani Cup 2024 : इराणी चषकासाठी शेष भारताचा संघ जाहीर, ऋतुराज गायकवाड कर्णधार

Irani Cup 2024 : सर्फराझ खान, ध्रुव जुरेल व यश दयाल इराणी चषकासाठी भारतीय संघातून मुक्त केले जाऊ शकतात.

42
Irani Cup 2024 : इराणी चषकासाठी शेष भारताचा संघ जाहीर, ऋतुराज गायकवाड कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

रणजी विजेता मुंबईचा संघ विरुद्ध शेष भारत असा इराणी चषकाचा (Irani Cup 2024) अंतिम सामना येत्या १ ऑक्टोबरपासून लखनौच्या एकाना स्टेडिअमवर सुरू होणार आहे. या लढतीसाठी शेष भारताच्या संघाची घोषणा झाली असून संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. दुसरं म्हणजे भारतीय संघातील सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे तीन खेळाडूही या सामन्यात खेळतील अशी दाट शक्यता आहे. भारताच्या अंतिम अकरा जणांच्या संघात या तिघांची वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे तिघांना निदान देशांतर्गत सरावाचा फायदा मिळावा, असा बीसीसीआयचा यामागे हेतू आहे.

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेत उपायुक्त दिघावकर, चंदा जाधव यांच्या बदल्या)

‘ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांचा समावेश शेष भारत संघात झाला आहे. भारतीय संघात अंतिम ११ जणांमध्ये त्यांना स्थान मिळालं नाही तर शेष भारत संघाकडून ते खेळू शकतील,’ असं बीसीसीआयच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. भारतीय संघ २७ सप्टेंबरला कसोटी सामना खेळणार आहे. इराणी चषकाचा (Irani Cup 2024) सामना हा त्यानंतर आहे. त्यामुळे या खेळाडूंविषयीचा निर्णय नंतर घेतला जाऊ शकतो. तसंच सर्फऱाझ खानही मुंबई संघाकडून खेळू शकतो.

(हेही वाचा – Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल – रणजित सावरकर)

शेष भारत संघातून इशान किशन कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्याच्यावरच यष्टीरक्षणाची धुरा असणार आहे. श्रेयस अय्यर, तनुष कोटियन आणि शम्स मुलानी हे खेळाडू मुंबईकडून खेळतील. तर साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन या खेळाडूंना शेष भारताकडून संधी मिळाली आहे.

शेष भारत संघ ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), देवदत्त पड्डिकल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुतार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलिल अहमद व राहुल चहर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.