Irani Cup 2024 : इराणी चषक विजेत्या मुंबईला १ कोटी रुपयांचं बक्षीस

Irani Cup 2024 : कर्णधार अजिंक्य रहाणेनं विजयाचं श्रेय आत्मविश्वासाला दिलं आहे. 

134
Irani Cup 2024 : इराणी चषक विजेत्या मुंबईला १ कोटी रुपयांचं बक्षीस
  • ऋजुता लुकतुके

२७ वर्षांनंतर इराणी चषकावर (Irani Cup 2024) नाव कोरणाऱ्या मुंबई संघाचं कौतुक मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात आलं. यावेळी संघाला १ कोटी रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं. कर्णधार अजिंक्य रहाणेनं विजयाचं श्रेय खेळांमधील आत्मविश्वास आणि त्यांना दिलेलं स्वातंत्र्य याला दिलं. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने हे विजेतेपद पटकावलं. सर्फराझ खानचं द्विशतक आणि तनुष कोटियनचं दुसऱ्या डावातील शतक आणि अष्टपैलू कामगिरी हे मुंबईच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.

बीसीसीआयकडून इराणी चषक (Irani Cup 2024) विजेत्या मुंबईला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनने संघाचा जाहीर सत्कार करताना १ कोटी रुपयांची भर घातली आहे. सोमवारी वानखेडे स्टेडिअमवर फटाके वाजवून संघाचं स्वागत करण्यात आलं.

(हेही वाचा – Mayank Yadav : मयंक यादव आता आयपीएल लिलावात ‘मिलियन डॉलर मॅन’)

कर्णधार अजिंक्य रहाणेनं सांघिक कामगिरीचं कौतुक करताना यशाचं श्रेय आत्मविश्वासाला दिलं. ‘माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की, हा खेळ ११ खेळाडूंसाठी आहे. यात कुणी एकटा दुकटा हीरो होऊ शकत नाही. ११ खेळाडू आणि बाहेर बसलेले ४-५ खेळाडू या सगळ्यांवर सांघिक जबाबदारी आहे. ती सगळ्यांनी निभावली तरंच विजय साध्य होतो,’ असं अजिंक्य म्हणाला. पुढे कप्तानीविषयी बोलताना अजिंक्य म्हणतो, ‘खेळाडूंना त्यांची जबाबदारी समजावून सांगितली. त्यांना आत्मविश्वास आणि मोकळीक दिली, की काम सोपं होतं.’ (Irani Cup 2024)

(हेही वाचा – Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत भारताचा सहभाग)

अंतिम सामन्यात सर्फराझ खानने नाबाद २२२ धावा केल्या. या खेळीसह भारतीय संघाचे दरवाजेही त्याने पुन्हा एकदा ठोठावले आहेत. या खेळीने बरंच काही शिकवलं असल्याचं सर्फराझने सांगितलं. ‘भारतीय संघाकडून २ कसोटी खेळल्यावर त्या अनुभवाने बरंच काही शिकवलं आहे. मी अजिंक्यला म्हटलं होतं, ५० पार गेलो तर बाद होणार नाही, मोठी खेळी करेन, ते शक्य झालं याचं समाधान आहे.’ २४ वर्षीय युवा तनुष कोटियननेही पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावांत ११४ धावा करताना ३ बळीही घेतले. तनुष कोटियनने या कामगिरीसह भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. (Irani Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.