Irani Cup 2024 : सर्फराझच्या द्विशतकी खेळीमुळे मुंबईचा धावांचा डोंगर, सचिन, रोहितला जमलं नाही ते सर्फराझने करून दाखवलं 

Irani Cup 2024 : इराणी चषकात द्विशतक झळकावणारा सर्फराझ पहिला मुंबईकर फलंदाज आहे 

65
Irani Cup 2024 : सर्फराझच्या द्विशतकी खेळीमुळे मुंबईचा धावांचा डोंगर, सचिन, रोहितला जमलं नाही ते सर्फराझने करून दाखवलं 
Irani Cup 2024 : सर्फराझच्या द्विशतकी खेळीमुळे मुंबईचा धावांचा डोंगर, सचिन, रोहितला जमलं नाही ते सर्फराझने करून दाखवलं 
  • ऋजुता लुकतुके 

रणजी गतविजेती मुंबई विरुद्ध शेष भारत असा इराणी चषकाचा अंतिम सामना सध्या लखनौच्या एकाना स्टेडिअमवर सुरू आहे. सामन्यात मुंबईने पहिल्या डावात पाचशेचा टप्पा पार केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्फराझ खानने (Sarfaraz Khan) नाबाद २२१ धावा केल्या आहेत. इराणी चषकाच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा तो पहिला मुंबईकर फलंदाज ठरलाय. स्पर्धेतील रणजी विजेत्या संघाकडून केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी रामनाथ पारकर १९७२ मध्ये पुण्यात खेळताना १९५ धावा केल्या होत्या. (Irani Cup 2024)

(हेही वाचा- पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्‍या E-Auction साठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)

यापूर्वी वसीम जाफर (Wasim Jaffer), प्रवीण आमरे (Pravin Amre), रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) यांनी इराणी चषकात द्विशतक केलं आहे. पण, तेव्हा हे तिघेही शेष भारत संघाचा भाग होते. (Irani Cup 2024)

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सर्फराझला ९५ धावांवर जीवनदान मिळालं होतं. पण, त्याचा फायदा उचलत त्याने धावा वेगाने वाढवल्या. २५३ चेंडूंतच द्विशतक पूर्ण केलं. २६ वर्षीय सर्फराझचं हे १५ वं प्रथमश्रेणी शतक आहे. (Irani Cup 2024)

 या द्विशतकाबरोबरच सर्फराझने (Sarfaraz Khan) आणखी एक विक्रम केला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी राखणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याची धावांची सरासरी सध्या ६९.६ इतकी आहे. त्याने नुकतंच अजय शर्माला मागे टाकलं आहे. आता सर्फराझ फक्त विजय मर्चंट यांच्याच मागे आहे. मर्चंट यांची सरासरी मात्र ८१.८ इतकी आहे. (Irani Cup 2024)

(हेही वाचा- संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांना Israel मध्ये प्रवेशबंदी)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराझला रनमशीन म्हटलं जातं. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात तो भारताकडून कसोटीही खेळला आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत दोन कसोटी खेळण्याची संधी त्याला मिळाली. पण, विराट भारतीय संघात परतल्यावर सर्फराझला अंतिम ११ मधून बाहेर बसावं लागलं आहे. त्यामुळे संघात निवड होऊनही तो बाहेर आहे. आता या द्विशतकानंतर त्याने भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत सर्फराझला आता चांगली संधी आहे. (Irani Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.