-
ऋजुता लुकतुके
अपेक्षेप्रमाणेच सर्फराझ खान, यश दयाल आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंना राष्ट्रीय संघातून मुक्त करत इराणी चषकासाठी (Irani Cup 2024) पाठवण्यात आलं आहे. इराणी चषकाचा (Irani Cup 2024) अंतिम सामना १ ऑक्टोबरपासून लखनौच्या एकाना स्टेडिअममध्ये होत आहे. आणि हे खेळाडू सोमवार दुपारी भारतीय संघाबरोबर कानपूर इथं होते. तिथून ते लखनौमध्ये दाखलही झाले आहेत. सर्फराझ खान (Sarfaraz Khan) रणजी विजेत्या मुंबईकडून तर यश आणि ध्रुव जुरेल शेष भारत संघाकडून खेळतील.
Update: Sarfaraz Khan, Dhruv Jurel and Yash Dayal have been released from India’s Test squad to participate in the #IraniCup, scheduled to commence tomorrow in Lucknow. pic.twitter.com/E0AsPuIVYX
— BCCI (@BCCI) September 30, 2024
(हेही वाचा – १९९० पासून Konkan Railway चा विकास खुंटलेला; महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी)
इराणी चषकात (Irani Cup 2024) रणजीतील विजेता संघ आणि उर्वरित भारताचा संघ असे दोन संघ आमने सामने येतात. रणजीच्या नवीन हंगामापूर्वी नियमितपणे हा सामना पार पडतो. मुंबईने २००० पासून एकदाही इराणी चषक (Irani Cup 2024) जिंकलेला नाही. इराणी सामन्यात मुंबई संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. तर शेष भारत संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. सर्फराझचा लहान भाऊ मुशीर खान रस्ते अपघातात झालेल्या दुखापतीमुळे मुंबईकडून खेळू शकणार नाही. तर ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) आणि यश दयाल (Yash Dayal) इराणी चषकात शेष भारत संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असतील.
इराणी चषक – मुंबई संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सर्फराझ खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शे़डगे, हार्दिक तोमरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान व रॉयस्टन डायस
शेष भारत संघ – ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पड्डिकल, ध्रुव जुरेल, ईशान किशन, मानव सुतार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, सुशांत रावत, खलिल अहमद व राहुल चहर.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community