- ऋजुता लुकतुके
भारताचे दोन माजी अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण आणि इरफान पठाण हे खरंतर दोघे भाऊ. भारत चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स सामन्यात दोघं फलंदाजीसाठी मैदानावर होते तेव्हा दोघांमध्ये एक खडाजंगीचा प्रसंग घडला. आणि दोघा भावांमधील ते भांडण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलंही. (Irfan-Yusuf Exchange)
झालं असं की, दोघांनी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. आधी युसुफने प्रतिसाद दिला. पण, अचानक तो क्रीझमध्येच थांबला. पण, तोपर्यंत इरफान अर्धी खेळपट्टी धावून पुढे आला होता. त्याला परतण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. त्यातच थेट फेकीमुळे इरफान बादही झाला. आपला मोठा भाऊ युसुफवर तो चांगलाच वैतागलेला या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. दोघंही एकमेकांकडे हातवारे करून बोलत होते. काहीवेळ वातावरण तंगीचं होतं. (Irfan-Yusuf Exchange)
पण, डाव संपल्यावर इरफान पठाणने मैदानात येऊन युसुफला मिठी मारली आणि भांडण संपवलेलंही दिसलं. दोघांचं भांडण आणि दिलजमाईवरून सोशल मीडियाला मात्र मिम्ससाठी चांगलंच खाद्य मिळालं. (Irfan-Yusuf Exchange)
🙈 @iamyusufpathan @India_Champions all brothers can relate to this… pic.twitter.com/eQRu31Wmub
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 11, 2024
(हेही वाचा – Kalyan Dombivli पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई!)
‘दोन भाऊ एकटे असताना एकमेकांशी कसं वागतात. पालकांसमोर एकमेकांना कशा मिठ्या मारतात, याचं हे उदाहरण पाहा,’ असं एकाने ट्विटरवर लिहिलं आहे. हा विनोदाचा भाग सोडला तर भारतीय चॅम्पियन्स संघाकडून खेळणाऱ्या या दोघांची तंदुरुस्ती हा या स्पर्धेत चर्चेचा विषय ठरला आहे. हा सामना भारतीय चॅम्पियन्स संघाने ५४ धावांनी गमावला. पण, चांगल्या धावगतीच्या आधारे स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. (Irfan-Yusuf Exchange)
पण, भारतीय संघातील खेळाडूंची तंदुरुस्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओत दिसणारे इरफान आणि युसुफ बंधूही जाड आणि पोट सुटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे लोकांनी त्यावरही भाष्य केलं आहे. (Irfan-Yusuf Exchange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community