Abhishek Sharma रोहित नंतरचा भारताचा नवीन हिटमॅन आहे का?

अभिषेकने इंग्लंड विरुद्धची मालिका आपल्या फटकेबाजीने दणाणून सोडली.

32
Abhishek Sharma रोहित नंतरचा भारताचा नवीन हिटमॅन आहे का?
Abhishek Sharma रोहित नंतरचा भारताचा नवीन हिटमॅन आहे का?
  • ऋजुता लुकतुके

पंजाबचा युवा फटकेबाज फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आपल्या फलंदाजीने दणाणून सोडली आहे. ३७ चेंडूंत शतक ठोकत तर मुंबईत त्याने षटकारांचं वादळच आणलं. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर १३ षटकारांची आतषबाजी केली हा योगायोग नसावा. कारण, अभिषेकच्या (Abhishek Sharma) या सातत्यपूर्ण मालिकेनंतर चर्चा अशीच सुरू झालीय की, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी अभिषेक आता भारताचा नवीन हिटमॅन बनला आहे का? रोहितने आतापर्यंत मनमुराद षटकार ठोकण्याच्या त्याच्या शैलीमुळे हे बिरुद मिळवलं होतं. गेल्यावर्षी जून महिन्यात टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदानंतर रोहितने टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली होती. तीच जागा अभिषेकने संघात भरून काढली आहे, सलामीवीराची. आता दोघांची फलंदाजीची शैली पाहता, रोहितचा वारसदार अभिषेकच आहे असं बोललं जाऊ लागलं आहे.

(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : महापालिका शाळांमध्ये स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा)

अर्थात, रोहितने (Rohit Sharma) आपल्या षटकार मारण्याच्या शैलीत सातत्य दाखवलं तेव्हा त्याला हिटमॅन नाव मिळालं. आणि अभिषेकला अजून सातत्य दाखवून द्यायचं आहे. पण, सध्या त्याने दोन गोष्टींत आपली चमक दाखवून दिली आहे. अभिषेक ज्याला आपला गुरू मानतो, अशा युवराजकडून त्याने शाबासकी मिळवली आहे. ‘युवराज पाजींना नेहमी वाटायचं की, मी १५-१६ षटकं तरी फलंदाजी करू शकलो पाहिजे. हे मी सातत्याने केलं पाहिजे. ते मी मुंबईत करू शकलो, याचं मला समाधान आहे,’ असं अभिषेक (Abhishek Sharma) सामन्यानंतर बोलताना म्हणाला. युवराजने जी अपेक्षा अभिषेककडून केली तो कसलेल्या सलामीवीराचा मापदंड आहे. अभिषेकला आता ते सातत्याने करून दाखवावं लागेल.

सध्या भारताकडून वेगवान टी-२० शतक आणि एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम करून अभिषेकने आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत सर्वात जास्त धावा करण्याच्या बाबतीत सध्या त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकलं आहे. तर तिलक वर्मा (Tilak Varma) त्याच्या पुढे आहे.

(हेही वाचा – Deccan College : पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी का असतात उत्सुक?)

५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा,

२८० – तिलक वर्मा (वि. दक्षिण आफ्रिका, २०२४)

२७९ – अभिषेक वर्मा (वि. इंग्लंड, २०२५)

२३२ – विराट कोहली (वि. इंग्लंड, २०२१)

२२४ – के एल राहुल (वि. न्यूझीलंड, २०२०)

तर एका डावांत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आता अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) नावावर जमा झाला आहे. यासाठी त्याने रोहितचा १० षटकारांचा विक्रम मागे टाकला आहे. तर एकाच सामन्यात शतक आणि २ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तर तो पहिला भारतीय खेळाडू आहे. या मालिकेतील कामगिरीमुळे अभिषेक भारताच्या टी-२० संघात आता स्थिरावेल. त्याने सातत्य राखलं तर तो बनेल भारताला नवा डावखुरा हिटमॅन.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.