Ishan Kishan Fiasco : आयपीएल खेळायची असेल तर ३-४ रणजी सामने खेळणं अनिवार्य होण्याची शक्यता

बीसीसीआयने इशान किशनला झारखंडचा शेवटचा साखळी सामना खेळण्यास सुनावलं आहे. 

247
Ishan Kishan Fiasco : आयपीएल खेळायची असेल तर ३-४ रणजी सामने खेळणं अनिवार्य होण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

इशान किशनने (Ishan Kishan) मानसिक थकव्याचं कारण देत घेतलेली प्रदीर्घ सुटी आणि रणजी सामने खेळण्याबद्दल त्याने दाखवलेली अनास्था यामुळे बीसीसीआयला (BCCI) काय करावं ते कळेनासं झालं आहे. संघात निवड व्हावी असं वाटत असेल तर रणजी सामने खेळून तिथे कामगिरी सिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी विश्रांती घेतलेल्या आणि फॉर्ममध्ये नसलेल्या सगळ्या खेळाडूंना दिले होते. अनेकांनी त्यांचा हा सल्ला वजा आदेश पाळलाही. (Ishan Kishan Fiasco)

पण, इशान किशन (Ishan Kishan) मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकव्याच्या कारणाने परतल्यानंतर मागचे दोन महिने रणजी सामने खेळलेला नाही. उलट अलीकडे मुंबई इंडियन्स संघाच्या बडोद्यातील सराव मैदानात तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर सराव करताना दिसला होता. त्याच्या या वागण्यामुळे बीसीसीआयचे (BCCI) अधिकारीही वैतागले आहेत. रणजी न खेळता इशान किशनची (Ishan Kishan) आयपीएलमध्ये खेळण्याची तयारी दिसत आहे. आणि राष्ट्रीय संघाला प्राधान्य न देता आयपीएल खेळण्याचा स्वभाव खेळाडूंमध्ये बोकाळू नये यासाठी बीसीसीआय (BCCI) येत्या दिवसांत कडक उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. इशान किशनच्या उदाहरणामुळे सगळेच बुचकाळ्यात पडले आहेत. तेव्हा आता आयपीएल खेळण्यासाठी हंगामात निदान ३-४ प्रथमश्रेणी सामने खेळणं अनिवार्य करण्यावर बीसीसीआय (BCCI) विचार करत आहे. तशी बातमी पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. (Ishan Kishan Fiasco)

(हेही वाचा – Congress Rajya Sabha Election 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर)

आयपीएल खेळण्यापूर्वी रणजी सामने खेळणं अनिवार्य

बीसीसीआयने आतापर्यंत इशान किशन (Ishan Kishan) प्रकरणावर एकदाही भाष्य केलेलं नाही. तो राष्ट्रीय संघातून का माघारी आला, त्यानंतर तो रणजी का खेळत नाही, त्याची संघात निवड होणार की नाही, या बाबतीत संघ प्रशासनानेही मौनच बाळगलं आहे. मीडियामध्ये उलट सुलट चर्चा मात्र रंगल्या. भारतीय टी-२० संघात निवड होत नाही हे पाहून इशानला नैराश्याने ग्रासलं होतं. आणि मानसिक थकव्याचं कारण देत तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही बीसीसीआयची (BCCI) परवानगी घेऊन अर्ध्यावर मायदेशी परतला होता. (Ishan Kishan Fiasco)

त्यानंतर त्याचा झारखंड संघ ए गटात तळाला असतानाही तो रणजी सामने खेळला नाही. पण, या दरम्यान बीसीसीआयने (BCCI) त्याच्याशी संपर्क केला का यावर काहीही स्पष्टता नाही. आता मात्र जमशेदपूरला होणारा शेवटचा साखळी सामना त्याने खेळावा असं बीसीसीआयने (BCCI) त्याला ठणकावून सांगितलं असल्याचं समजतं. इतकंच नाही तर इतर खेळाडूंसाठीही आयपीएल खेळण्यापूर्वी रणजी सामने खेळणं अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. (Ishan Kishan Fiasco)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.