Ishan Kishan : अखेर इशान किशनचं स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन 

रणजी न खेळल्यामुळे वादात सापडलेला इशान किशन नवी मुंबईत डी वाय पाटील स्पर्धेत खेळला. 

162
Ishan Kishan : अखेर इशान किशनचं स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन 
  • ऋजुता लुकतुके

रणजी सामन्याला जाणून बुजून दांडी मारल्याचा आरोप असलेला इशान किशन (Ishan Kishan) स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये अखेर परतला आहे. नवी मुंबईत डी वाय पाटील टी-२० स्पर्धेत तो आरबीआय संघाकडून खेळला. आणि यात त्याने एक खेळाडू यष्टीचीत करण्याबरोबरच १२ चेंडूंत १९ धावाही केल्या. यात एक षटकार आणि एक चौकार होता. त्याने सामन्यात यष्टीरक्षणही केलं. आणि सुमित ढेकळे या फलंदाजाला बादही केलं. (Ishan Kishan)

इशानच्या (Ishan Kishan) या कामगिरीनंतरही त्याच्या संघाचा ८९ धावांनी पराभव झाला. प्रतिस्पर्धी संघाने पहिली फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १९२ धावा केल्या त्या आयुष वर्तनच्या ५४ आणि ढेकळेच्या ४२ धावांच्या जोरावर. आणि याला उत्तर देताना इशान किशनचा आरबीआय संघ १०३ धावांत सर्वबाद झाला. (Ishan Kishan)

(हेही वाचा – Aaditya Thackeray यांना X वर ट्रोल का केले गेले?)

इशान किशनवर झाली होती ही टीका

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीकडून खेळणारा इशान किशन (Ishan Kishan) डिसेंबर महिन्यात शेवटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना मानसिक थकव्याचं कारण देऊन तो दौरा अर्धवट टाकून परतला होता. त्यानंतर मुंबई फ्रँचाईजीच्या बडोद्यातील मैदानावर तो सराव करत होता. पण, रणजी किंवा इतर देशांतर्गत सामने खेळला नाही. म्हणजेच आयपीएलला प्राधान्य देऊन स्थानिक सामने तो टाळत असल्याची टीका त्याच्यावर झाली होती. (Ishan Kishan)

यामुळे त्याने बीसीसीआयचा रोष तर ओढावून घेतलाच शिवाय आयपीएल किंवा इतर कुठलंही लीग क्रिकेट खेळण्यापूर्वी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सहभागी होणं अनिवार्य करण्याचा नियम करण्यावर आता बीसीसीआय विचार करतंय. ती वेळही इशाननेच (Ishan Kishan) मंडळावर आणली, असं बोललं गेलं. खेळाडूंबरोबरच्या मध्यवर्ती करारातून इशान किशनला वगळण्यात येईल की काय अशी भीतीही यावरून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इशान स्पर्धात्मक क्रिकेट पुन्हा कधी सुरू करतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अर्थात, हा सामनाही टी-२० चाच होता. आणि ही कॉर्पोरेट स्तरावरील मानाची टी-२० स्पर्धा होती. (Ishan Kishan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.