-
ऋजुता लुकतुके
भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या टी-२० मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, त्याही पेक्षा जास्त चर्चा मागचे काही दिवस ईशान किशनच्या (Ishan Kishan) वगळण्याची झाली आहे. त्यातही ईशान किशनवर (Ishan Kishan) शिस्तभंगाची कारवाई झाल्याची बातमी आली त्यामुळे तर खळबळ माजली. बीसीसीआयकडून मानसिक थकव्यासाठी सुटी घेऊन दुबईत पार्टी केल्याची बातमी मध्यंतरी पसरली होती.
पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी ईशानवर शिस्तभंगाची कारवाई झाली नसल्याचं स्पष्ट केलं. पण, त्याचवेळी इशानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ईशान किशनने (Ishan Kishan) सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे.
(हेही वाचा – Prabha Atre: भारतरत्न, पद्मविभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन)
🏃♂️ pic.twitter.com/XjUfL18Ydc
— Ishan Kishan (@ishankishan51) January 12, 2024
ईशानने आपला मेडिटेशन आणि व्यायाम करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. आणि क्रिकेटसाठी तयार होत असल्याचंच त्याने एकप्रकारे स्पष्ट केलं आहे. पण, त्याचवेळी ईशान भारतीय संघ निवडीचा चक्रव्यूह भेदू शकेल का हा प्रश्नच आहे.
कारण, राहुल द्रविडने (Rahul Dravid) इशानला स्पष्टपणे देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. याचाच अर्थ ईशान किशन (Ishan Kishan) संघ निवडीच्या शिडीवर खूप तळाला आहे. अफगाणिस्तान विरुद्धची मालिका आता गेल्यात जमा आहे. आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही इशानचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोना रमेश त्या स्पर्धेत सध्या आघाडीवर आहे. तर के एल राहुलही पॅड बांधून तयार आहे.
(हेही वाचा – Australian Open Tennis : भारताच्या सुमित नागलचा मुख्य स्पर्धेत प्रवेश)
त्यातच दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळी मानसिक थकव्यासाठी सुटी मागणारा ईशान अजून क्रिकेटसाठी मैदानात उतरलेलाच नाही. रणजी करंडकासाठीही त्याने झारखंड क्रिकेट असोसिएशनसाठी संपर्क साधलेला नाही. पीटीआयशी बोलताना झारखंड असोसिएशनच्या देबाशिष चक्रवर्ती यांनी तसं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच राहुल द्रविड यांनी म्हटल्याप्रमाणे देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी ईशान अजून तयार नाही. मग भारतीय संघात समावेशाच्या दृष्टीने अजून तो सकारात्मक हालचाली करताना दिसत नाहीए हे नक्की.
अशावेळी संघ निवडीच्या बाबतीतही तो अजून चक्रव्यूहात अडकलेलाच आहे हे नक्की.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community