-
ऋजुता लुकतुके
पेरु देशात लिमा इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात भारतीय संघाने दमदार सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी सर्वच प्रकारात भारताला किमान एक पदक मिळालं. विशेष म्हणजे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ऑलिम्पिक चॅम्पियन मनू भाकरला मागे टाकत भारताच्याच सुरुची सिंगने सुवर्ण जिंकलं. तर मनूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या गटात याच प्रकारात सौरभ चौधरीने कांस्य जिंकलं. (ISSF Shooting World Cup)
१८ वर्षीय सुरूचीने सलग दुसरं विश्वचषक सुवर्ण जिंकताना अंतिम फेरीत २४३.६ गुणांची कमाई केली. मनूपेक्षा तिला १.३ गुण जास्त मिळाले. चीनच्या याओ क्विनसनला या प्रकारात कांस्य मिळालं. सुरुचीने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. अंतिम फेरीत मनू भाकरशी स्पर्धा करण्याबद्दल तिला आत्मविश्वास होता. ‘मला जिंकण्याचा विश्वास होता. बरोबर कोण खेळतंय याचा मी विचार करत नाही. माझी स्पर्धा माझ्याशी असते. मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा होता,’ असं सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुरुची म्हणाली. पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरुचीने सुवर्णापर्यंत मजल मारली हे कौतुकास्पद आहे. (ISSF Shooting World Cup)
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने सांगितला सिडनी टेस्टमधून स्वत:ला वगळण्याचा घटनाक्रम)
Two of India’s best go head-to-head, with Inder Singh Suruchi beating Manu Bhaker to gold! 🇮🇳🥇#ISSF #ISSFWorldCup #ShootingSports pic.twitter.com/VYi07cGcCM
— ISSF (@issf_official) April 15, 2025
दुसरीकडे, ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच शूटिंग रेंजवर परतलेल्या मनू भाकरने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच सुरुचीचंही तिने अभिनंदन केलं. ‘आधीच्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये सुरुचीने चांगली कामगिरी केली आहे. भारताचे युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी सुद्धा त्यांच्या तुल्यबळ कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन,’ असं मनू भाकर म्हणाली. (ISSF Shooting World Cup)
पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सौरभ चौधरीने कांस्य पटकावलं. एकेकाळी ही स्पर्धा गाजवणाऱ्या सौरभने गेल्या २ वर्षांत मिळवेललं हे पहिलं विश्वचषक पदक आहे. त्याने २१९.२ गुणांची कमाई केली. तर चीनच्या हु काईने सुवर्ण जिंकताना २४६ गुण कमावले. (ISSF Shooting World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community