ऋजुता लुकतुके
भारताचे पिस्तुल नेमबाज तियाना, साक्षी सूर्यवंशी आणि किरणदीप कौर यांनी ५० मीटर सांघिक प्रकारात सुवर्णाला गवसणी घातली. त्यामुळे ISSF नेमबाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १४ पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला. या १४ पदकांमध्ये ५ सुवर्ण तर ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीनने आपला अव्वल क्रमांक कायम राखला. ५० मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने १,५७३ गुण कमावले. तर रौप्य विजेता चीनचा संघ १,५६७ गुणांवर राहिला. मंगोलियाचा संघ १,५६६ गुणांसह तिसरा आला.
भारतीय संघात लक्षवेधी ठरली ती युवा नेमबाज तियाना. सांघिक स्पर्धेत तिने सर्वाधिक ५३३ गुण कमावले. आणि त्याचबरोबर वैयक्तिक प्रकारातही तिने कांस्य पदकाची कमाई केली. वैयक्तिक प्रकारात साक्षी सूर्यवंशी पाचवी तर किरणदीप कौर अकरावी आली.
Latest Updates from @issf_official #Shooting🔫 #WorldChampionships
4⃣ back to back 🏅for Team 🇮🇳
Check out the Medalists & their categories👇
🥇: The Trio of Tiyana, Sakshi & Kirandeep Kaur in 50m Pistol Team Event
🥉: The trio of Ravinder, Kamaljeet & Vikram Shinde in 50m… pic.twitter.com/XlP6iBjQNR
— SAI Media (@Media_SAI) August 25, 2023
(हेही वाचा –A History Day : ॲथलेटिक्स विश्वविजेतेपदाच्या भालाफेक प्रकारात एकाच वेळी तीन भारतीय अंतिम फेरीत)
शुक्रवार स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. आणि या दिवशी महिला तसंच पुरुषांच्या पिस्तुल प्रकारातील लढती बाकी होत्या. पुरुषांच्या पिस्तुल प्रकारातही ५० मीटरमध्ये भारताला २ कांस्य पदकं मिळाली. रविंदर सिंगने वैयक्तिक प्रकारात ५५६ गुणांसह कांस्य पदक जिंकलं. आणि नंतर सांघिक प्रकारात विक्रम शिंदे आणि कमलजीत यांच्या साथीने आपलं दुसरं कांस्य पदक जिंकलं. ISSF विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय संघाने १४ पदकांबरोबरच ४ पॅरिस ऑलिम्पिक पात्रता कोटाही मिळवले.
हेही पहा –