मराठमोळ्या राहीने साधला अचूक ‘निशाणा’! शूटिंगमध्ये पटकावले सुवर्ण पदक!

राहीने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे, यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही राहीकडून मेडल जिंकण्याची अपेक्षा वाढली आहे.

105

टोकयो येथे ऑलिम्पिक स्पर्धेच्या भारतवासियांसाठी आता आनंदाच्या वार्ता ऐकू येऊ लागल्या आहेत. क्रोएशिया येथे सध्या शूटिंग वर्ल्ड कप सुरु आहे. त्यामध्ये राही सरनोबतने सुवर्ण पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे राही ही मराठमोळी असून ती कोल्हापूर जिल्ह्यातली आहे.

राहीने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे, यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही राहीकडून मेडल जिंकण्याची अपेक्षा वाढली आहे. राहीचे या वर्ल्ड कपमधील हे दुसरे पदक आहे, याआधी तिने 10 मीटर एयरपिस्टल प्रकारात महिला टीम इव्हेंटमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

rahi sarnobat

(हेही वाचा : अॅथलेटिक ट्रॅक झाले नेत्यांच्या गाड्यांचे वाहनतळ!)

शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर

राहीने 25 मीटर स्पोर्ट्स फायनलमध्ये 39 पॉईंट्स मिळवले, पण वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यापासून ती एक पॉईंट मागे राहिली, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या शूटरपेक्षा राहीला 8 पॉईंट्स जास्त मिळाले. शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके मिळाली आहे. पदकांच्या स्पर्धेत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. रशिया 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल क्वालिफायिंग राऊंडमध्ये राही 591 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आणि मनू भाकर 588 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या, पण मनूला फायनलमध्ये चमक दाखवता आली नाही.

ऑलिम्पिकपूर्वीची अखेरची स्पर्धा

टोकयो ऑलिम्पिकआधी शूटिंगची ही सगळ्यात मोठी आणि अखेरची स्पर्धा आहे. यानंतर खेळाडू ऑलिम्पिकसाठी जपानला रवाना होतील. यावर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाणार आहे. टोकयो ऑलिम्पिक मागच्या वर्षीच होणार होती, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.