Rahul Dravid : राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतणार?

Rahul Dravid : टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांची भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी संपली आहे. 

135
Rahul Dravid : राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून दाखल होतील, असं दिसतंय. दोघांमध्ये सध्या बोलणी सुरू असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. ५१ वर्षीय राहुल द्रविड (Rahul Dravid) बरीच वर्षं राजस्थान रॉयल्स या आयपीएल फ्रँचाईजीबरोबर जोडलेला आहे. शेन वॉर्नबरोबर एकत्र काम करताना त्याने खेळाडू म्हणून २०१३ साली राजस्थान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत नेलं होतं. २०१३ मध्येच राजस्थान संघ प्लेऑफलाही पोहोचला होता. (Rahul Dravid)

त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये तो संघाचा मार्गदर्शक होता. या कालावधीत संघ लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. २०१५ पासून मात्र राहुल द्रविड बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीत काम करत आहे. तिथे तो भारतीय ए तसंच १९ वर्षांखालील संघाबरोबर नियमितपणे काम करत होता. २०२२ मध्ये त्याने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी उचलली. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Abhinav Bindra : अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक चळवळीतील योगदानासाठी ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान)

आता पुन्हा एकदा आयपीएलबरोबर राहुल द्रविड जोडला जाऊ शकतो. द्रविड ताफ्यात दाखल झाला तर राजस्थान फ्रँचाईजीचे सध्याचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांचं पुढे काय होणार हे अजून स्पष्ट नाही. म्हणजे, ते पदावर कायम राहतात की, राहुल द्रविडलाच सर्वाधिकार दिलेल जातात हे पहावं लागेल. (Rahul Dravid)

दरम्यान भारत व श्रीलंका हे दोन संघ सध्या श्रीलंकेतील टी-२० आणि एकदिवसीय मालिकांची तयारी करत आहेत. त्यासाठी झुबिन भरुचा हे राजस्थान रॉयल्सचे हायपरफॉर्मन्स संचालक श्रीलंकन संघाला फलंदाजीत मदत करणार आहेत. ते एक आठवडा श्रीलंका संघाबरोबर आहेत. (Rahul Dravid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.