- ऋजुता लुकतुके
लॉर्ड्सवर सुरू असलेली इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी इंग्लिश प्रेक्षकांसाठी नेहमीसारखी नव्हती. त्यांचा अव्वल तेज गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) कसोटी क्रिकेटला राम राम करणार होता. त्यामुळेच तिसऱ्या दिवशी कसोटीचा शेवट जवळ आल्यावर हळू हळू प्रेक्षक लॉर्ड्सकडे वळले. तोपर्यंत अँडरसनने कसोटीत ४ बळी घेतलेले होते. त्यामुळे त्याची एकूण बळींची संख्या ७०४ वर पोहोचली होती आणि विंडिजचा दुसरा डाव १३६ धावांवर संपुष्टात आल्यावर कसोटीतील तिसऱ्या यशस्वी गोलंदाजाने क्रिकेटला भावपूर्ण निरोप दिला. (James Anderson)
(हेही वाचा- Mumbai Rain: घराबाहेर पडणं टाळा! पुढचे 36 तास महत्वाचे, हवामान विभागानं दिला इशारा)
इंग्लिश संघ पॅव्हेलियनमधून ड्रेसिंग रुममध्ये परतणार होता. तर लोकांनी कसोटी संपल्यानंतरही इथं गर्दी केली होती. त्यांना अँडरसनला शेवटचं मैदानावर पाहायचं होतं. सगळ्यांचा मान राखत अँडरसननेही मग गच्चीतून हात उंचावत सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा स्वीकारलं. (James Anderson)
Jimmy delivering the goods at Lord’s, one last time 🤣🍻 pic.twitter.com/QdFjUDVLIA
— England Cricket (@englandcricket) July 12, 2024
विशेष म्हणजे २००३ मध्ये याच मैदानात अँडरसन आपली पहिली कसोटी खेळला होता. जोशुआ डी सिल्वा (Joshua da Silva) हा त्याचा कसोटीतील शेवटचा बळी ठरला. मागच्या २१ वर्षांत अँडरसनची गोलंदाजीची शैली सातत्यपूर्ण आणि कधीही न बदललेली राहिली. तरीही तो यशस्वी ठरला. (James Anderson)
These two 🥺🥺 pic.twitter.com/55M4XAOvTm
— England Cricket (@englandcricket) July 12, 2024
फिरकीपटूंच्या तुलनेत तेज गोलंदाजांची कारकीर्द छोटी असू शकते. गोलंदाजीतील वेग आणि त्यामुळे लागणारी ताकद यामुळे कारकीर्दीची लांबी कमी होऊ शकते. गोलंदाजीतील धार कमी होऊ शकते. पण, अँडरसन तेज गोलंदाजांमध्ये सगळ्यात यशस्वी आणि मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांच्या खालोखाल तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर ७०४ कसोटी बळींची नोंद आहे. तर सचिन तेंडुलकरच्या २०० कसोटींच्या खालोखाल तो १८८ कसोटी खेळणारा सगळ्यात अनुभवी कसोटीपटू आहे. (James Anderson)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community