James Anderson Knighthood : जेम्स अँडरसनला इंग्लंडकडून नाईटहूड

James Anderson Knighthood : अँडरसनने इंग्लंडकडून कसोटींत ७०० हून जास्त बळी घेतले आहेत.

33
James Anderson Knighthood : जेम्स अँडरसनला इंग्लंडकडून नाईटहूड
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज इंग्लिश तेज गोलंदाज जेम्स अँडरसनला ‘नाईटहूड’ बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्याच्या नावावर ७०० हून जास्त कसोटी बळी आहेत. इंग्लंडचा तो सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याच्या सन्मानार्थ ‘क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या योगदानासाठी’ त्याला नाईट हा मानाचा खिताब देण्यात येणार आहे. (James Anderson Knighthood)

(हेही वाचा – Nagpur जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमध्ये ॲल्युमिनियम कारखान्याचा स्फोट, ५ ठार)

ऋषी सुनक यांनी गेल्याच वर्षी एका ट्विटमध्ये जेम्स अँडरसनबरोबर नेट्समध्ये केलेल्या सरावाचे फोटो टाकले होते. सुनक यांची क्रिकेटपटूंशी कायम जवळीक होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान असताना अँडरसनला नाईटहूड बहाल करण्याचा प्रस्ताव दिला होता. (James Anderson Knighthood)

(हेही वाचा – “भारतीय त्याच लायकीचे आहेत…” Tahawwur Rana चं वक्तव्य ; अमेरिकेच्या न्याय खात्याने दिली महत्त्वाची माहिती)

त्यामुळे सुनक यांच्या निवृत्तीच्या सोहळ्यातच अँडरसनच्या नाईटहूडचा कार्यक्रम पार पडेल. ४२ वर्षीय जेम्स अँडरसनच्या खात्यात ७०४ कसोटी बळी जमा आहेत. मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०४) यांच्या खालोखाल सर्वाधिक कसोटी बळींच्या क्रमवारीत अँडरसनचाच क्रमांक लागतो. पण, हे दोघे फिरकीपटू होते. त्यामुळे अँडरसन तेज गोलंदाजांच्या बाबतीत पहिला आहे. तेज गोलंदाजांचा तंदुरुस्तीच्या बाबतीत कस लागतो. हे पाहता, कसोटींत ७०० च्या वर मजल मारणं ही मोठी गोष्ट आहे. कारण, अँडरसनच्या मागोमाग सर्वाधिक बळी मिळवणारा पुढचा तेज गोलंदाज आहे तो स्टुअर्ट ब्रॉड. त्याच्या नावावर ६०३ बळी आहेत. तर ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू ग्लेन मॅग्राच्या नावावर ५६३ बळी आहेत. पहिल्या दहा सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाच तेज गोलंदाज आहेत. (James Anderson Knighthood)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.