Jannik Sinner : यानिक सिनरला २०२४ चा एटीपी चषक

Jannik Sinner : वर्षाच्या शेवटी यानिक सिनर एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. 

42
Jannik Sinner : यानिक सिनरला २०२४ चा एटीपी चषक
  • ऋजुता लुकतुके

व्यावसायिक टेनिसमध्ये वर्षअखेरीस अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूला एटीपीचा चषक दिला जातो. यंदा इटालियन खेळाडू यानिक सिनरला (Jannik Sinner) तो मान मिळाला आहे. एटीपी अंतिम स्पर्धेत उपांत्य फेरीत त्याचा पराभव झाला असला तरी क्रमवारीतील अव्वल स्थान त्याने राखलं आहे. त्यामुळे ट्युरिन इथं सुरू असलेल्या एटीपी अंतिम फेरी दरम्यान सिनरला हा चषक देण्यात आला. जर्मन स्टार खेळाडू बोरिस बेकरच्या हस्ते सिनरला हा चषक देण्यात आला.

सिनरने (Jannik Sinner) या चषकाबरोबरच नोवाक जोकोविचची आठ हंगामांची सद्दी मोडून काढली आहे. गेले ८ हंगाम जोकोविचने वर्षअखेरीस अव्वल स्थान पटकावलं होतं. ती जागा आता यानिक सिनरने घेतली आहे.

(हेही वाचा – Virender Sehwag : विरेंद्र सेहवागने कारकीर्दीत किती षटकार ठोकले?)

वर्षअखेरीस हा चषक पटकावणारा सिनर (Jannik Sinner) हा पहिला इटालियन खेळाडू आहे. ‘इटलीमध्ये माझ्या या चषकामुळे सगळ्यांना नक्की आनंद होईल. खासकरून, माझ्यासाठी ज्या लोकांनी त्याग केलाय त्या माध्या कुटुंबीयांना तर आज आकाश ठेंगणं झालं असेल. मला हा चषक मिळणार म्हणून माझी आई घरी रडली. तिला आनंदश्रू आवरता आले नाहीत. हे सगळे माझ्या जवळचे लोक आहेत. आणि त्यांनाच आम्ही इथे पोहोचण्यासाठी किती कष्ट घेतले याची जाणीव आहे,’ अस भावूक झालेला सिनर यावेळी म्हणाला.

(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली, मालाडमध्ये अभूतपूर्व विकास होईल – केंद्रीय मंत्री Piyush Goyal)

यानिक सिनर (Jannik Sinner) वर्षअखेरीला हा चषक जिंकणारा १९ वा खेळाडू आहे. तर राफेल नदाल, नोवाक जोकोविच, कार्लोस अल्काराझ यांच्या नंतरचा चौथा सक्रिय टेनिसपटू आहे. यावर्षी सिनर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोनदा दोषी आढळला होता. पण. सुदैवाने ही चूक नकळत, अनावधानाने झाली असल्याचं त्याने सिद्ध केलं. आणि त्याच्यावरील बंदी हटली. हा कालावधी फुकट जाऊनही सिनरने अव्वल स्थान कायम राखलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.