Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांचं पुनरागमन लांबलं

बुमराह व आकाशदीप सध्या बंगळुरूमध्ये आहेत.

60
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांचं पुनरागमन लांबलं
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांचं पुनरागमन लांबलं
  • ऋजुता लुकतुके

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व आकाशदीप (Akashdeep singh) या भारताच्या दोन तेज गोलंदाजांचं स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुमरागमन आणखी काही दिवसांनी लांबलं आहे. बुमराह (Jasprit Bumrah) बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत दुखापतीनंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमात व्यस्त आहे. त्याने नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली असली तरी पाठीच्या नाजूक झालेल्या हाडांना आणि स्नायूंना अतिरिक्त ताण पडू नये यासाठी अजून तो पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करत नाहीए. बुमराह शारीरिक क्षमतेच्या बाबतीत आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पण, स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा पूर्ण भार सोसू शकेल इतका तो अजून तंदुरुस्त झालेला नाही. एकेका आठवड्याने त्याची शारीरिक तपासणी करून त्याचा गोलंदाजीचा वेळ वाढवण्यात येणार आहे. दुसरीकडे आकाशदीपही (Akashdeep singh) किमान आणखी एक आठवडा स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकणार नाहीए.

(हेही वाचा – Maharashtra Weather : IMD चा 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट ; पुढील पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचे !)

बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाशदीप (Akashdeep singh) या दोघांना पाठीच्या दुखापतीने सतावलं आहे. आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीनंतर दोघंही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाहीत. हा दौरा संपल्या संपल्या आकाशदीप (Akashdeep singh) निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. तर बुमराहची दुखापत थोडी जास्त गंभीर आहे. आणि एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा दुखापत झाली असल्यामुळे काळजीही घ्यावी लागणार आहे. आयपीएल संपल्या संपल्या भारतीय संघ लगेचच जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. आणि तिथे पाच कसोटी सामन्यांची एक मालिका होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय बुमराहच्या बाबतीत बीसीसीआयला कुठलीही जोखीम पत्करायची नाही. इंग्लंडमध्ये पाच पैकी पाच कसोटी बुमराह (Jasprit Bumrah) खेळेल अशी शक्यताही कमीच आहे.

(हेही वाचा – BEST च्या बसचा उफराटा नियम; अपंगांसाठी राखीव सीट पण उंचावर)

‘बुमराहची (Jasprit Bumrah) दुखापत नक्कीच जास्त गंभीर आहे. गोलंदाजीच्या अती सरावामुळे त्याचं हाड दुखावून मोडू शकतं. त्यामुळे खुद्द बुमराहही काळजीपूर्वक गोलंदाजी करत आहे. तो पुन्हा कधी खेळायला लागेल हे आताच सांगता येणार नाही. डॉक्टरनीही तसं काही कळवलेलं नाही,’ बीसीसीआयमघील (BCCI) सूत्रांनी ही माहिती मीडियाला दिली आहे. आकाशदीप, लखनौचा गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) हे दोघेंही दुखापतीच्या एकाच टप्प्यावर आहेत. बीसीसीआयने (BCCI) अलीकडेच ठरवलेल्या नियमांनुसार, क्रिकेट अकादमीतील डॉक्टर खेळाडूची तंदुरुस्ती ठरवतात. त्यानंतर तिथले गोलंदाजीचे प्रशिक्षक खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकतात की नाही याचा निर्णय घेतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.