ICC World Cup 2023 : भारतीय संघाच्या सरावादरम्यान विराट कोहलीची मजेशीर धाव, व्हीडिओ व्हायरल

157
ICC World Cup 2023 : भारतीय संघाच्या सरावादरम्यान विराट कोहलीची मजेशीर धाव, व्हीडिओ व्हायरल
ICC World Cup 2023 : भारतीय संघाच्या सरावादरम्यान विराट कोहलीची मजेशीर धाव, व्हीडिओ व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

सरावा दरम्यानही वातावरण हलकं फुलकं ठेवण्यासाठी स्टार फलंदाज विराट कोहली प्रसिद्ध आहे. आताही मैदानावर विचित्र धाव घेऊन त्याने मैदानात हशा पिकवला. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि नेटकऱ्यांनी त्यावर खुमासदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. मागचे तीन दिवस भारतीय संघ चेन्नईच्या कडक आणि दमट उन्हाळ्यात सराव करत आहे. अशा थकवणाऱ्या सरावाच्या वेळी स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या विचित्र हालचालींमुळे काही क्षण साथी खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. (ICC World Cup 2023)

नेटकऱ्यांनाही विराटचा हा अंदाज आवडतोय. नेमकं काय झालं ते आधी पाहा,

विराट पॅड्स बांधून फलंदाजीसाठी तयार आहे आणि खेळपट्टीकडे जाताना तो दोन्ही हात हलवत विचित्र धावत जातो. अनेकांनी विराटच्या या धावण्याची तुलना आशिया चषकातील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तो वॉटरबॉय म्हणून आला तेव्हाच्या धावेशी केली आहे.

याच व्हीडिओत विराट काही क्षणांसाठी जसप्रीत बुमराशी चेष्टामस्करी करतानाही दिसतोय.

नेटकऱ्यांनी या व्हीडिओला भरभरून दाद दिली आहे. एका चाहत्याने या धावेची तुलना आशिया चषकातील धावेशी केली आहे. आणि वर तो म्हणतो, ‘तेव्हाची आणि आताची ऊर्जा सारखीच आहे.’

सुरेश परमार यांनी विराटला किंग कोहली म्हणून या फोटोवर हार्टचं इमोजी दिलं आहे. (ICC World Cup 2023)

(हेही वाचा – Mahadev App : बॉलिवूड सेलिब्रेटींनी घेतला धसका, जुगाराच्या जाहिरातीवरून सेलिब्रेटी गायब)

हे काही क्षण सोडले तर एरवी शुक्रवारचं हे सराव सत्र गंभीरच होतं. सलामीवीर शुभमन गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह असल्यामुळे असेल, पण, सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने नेट्समध्ये कसून फलंदाजी केली. दोघंही जवळ जवळ अडीच तास नेट्समध्ये होते. आणि कर्णधार रोहीत शर्मा दोघांची फलंदाजी जवळून बघत होता.

गिल ऐवजी ईशान किशन किंवा सुर्यकुमार यादव असे दोन पर्याय भारतासमोर असू शकतात. सुर्यकुमारला खेळवलं तर के एल राहुलला ५० फटकं यष्टीरक्षण करावं लागेल. त्यामुळे संघ प्रशासनासाठी हा निर्णय कठीण असू शकतो.

गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराचे चेंडू वेगात येत होते आणि स्विंगही होत होते. (ICC World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.