Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह पुढील तपासणीसाठी बंगळुरूमध्ये दाखल, चॅम्पियन्स करंडक खेळणं अवघड?

30
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह पुढील तपासणीसाठी बंगळुरूमध्ये दाखल, चॅम्पियन्स करंडक खेळणं अवघड?
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह पुढील तपासणीसाठी बंगळुरूमध्ये दाखल, चॅम्पियन्स करंडक खेळणं अवघड?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखऱ्या पाठीची स्थिती समजून घेण्यासाठी बंगळुरूला पोहोचला आहे. तिथे क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय चमूच्या देखरेखीखाली त्याच्या पाठीच्या दुखापतीचे स्कॅन घेतले जातील. आणि त्यातून दुखापतीचं स्वरुप कळल्यावर त्याच्या क्रिकेटमधील सहभागावर निर्णय होईल. चॅम्पियन्स करंडकासाठीच्या (Champions Trophy) संघात बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. पण, अंतिम निर्णय त्याची तंदुरुस्ती पाहूनच घेण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाची (Harshit Rana) निवड करण्यात आली आहे.

पुढील २ ते ३ दिवस जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बंगळुरूतच असेल. आणि तिथले डॉक्टर त्याची तपासणी करून आपला अहवाल बीसीसीआयला (BCCI) सादर करतील. त्यानंतर त्याच्या संघातील समावेश निश्चित होईल. ‘बुमराहला सध्या ५ आठवडे क्रिकेट आणि इतर व्यायामापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. इंग्लंड विरुद्ध पहिले दोन सामने तो खेळू शकणार नाही. त्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीची परीक्षा होईल. आणि त्याचा संघात समावेश करता येईल,’ असं निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी गेल्या महिन्यात संघ जाहीर करताना म्हटलं होतं.

(हेही वाचा – ठरलं तर! PM Narendra Modi आणि डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीच्या ‘या’ दिवशी भेटणार)

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) स्पर्धा सुरू होणार आहे. आणि त्यापूर्वी १२ तारखेपर्यंत संघातील खेळाडू बदलण्याची संधी संघ प्रशासनाला असेल. त्यामुळे बुमराहविषयी निर्णय घेण्यासाठी आणखी १० दिवस बीसीसीआयकडे (BCCI) आहेत. भारतीय संघ १५ फेब्रुवारीला दुबईला जाण्यासाठी निघेल.

भारतीय संघ आपले चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy) सर्व सामने दुबईतच खेळणार आहे. २० तारखेला भारताचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे. तर पाकिस्तानबरोबरची बहुचर्चित लढत २३ तारखेला दुबईतच होणार आहे. सध्या भारतीय संघात तात्पुरता बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाची (Harshit Rana) निवड झाली आहे. जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर तोच चॅम्पियन्स करंडकाची (Champions Trophy) वारी करेल हे जवळ जवळ निश्चित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.