Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नेट्समध्ये गोलंदाजी सुरू, नेटकऱ्यांचा आग्रह उपान्त्य फेरीत खेळण्याचा

Jasprit Bumrah : नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ बुमराने स्वत: शेअर केला आहे.

41
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नेट्समध्ये गोलंदाजी सुरू, नेटकऱ्यांचा आग्रह उपान्त्य फेरीत खेळण्याचा
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नेट्समध्ये गोलंदाजी सुरू, नेटकऱ्यांचा आग्रह उपान्त्य फेरीत खेळण्याचा
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नेट्समध्ये गोलंदाजी करायला लागला आहे. त्याने स्वत:च गोलंदाजीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत बुमराहची पाठ दुखावली होती. त्यानंतर दीड महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. चॅम्पियन्स करंडकातून (Champions Trophy) ऐन वेळी त्याचं नाव मागे घेण्यात आलं होतं. तो खेळत नसतानाही भारतीय संघाने उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी तो दुबईत होता. आयसीसीचे चार पुरस्कार तेव्हा त्याला प्रदान करण्यात आले होते. भारत – पाक सामन्याची मजा त्याने पॅव्हेलिअनमध्ये बसून लुटली. आणि आता तो नेट्समध्ये गोलंदाजीला लागला आहे. ‘प्रत्येक दिवशी थोडी प्रगती,’ असा मथळा त्याने आपल्या व्हिडिओला दिला आहे.

(हेही वाचा – Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली)

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

पण, बुमराहला पूर्ण रनअपसह गोलंदाजी करताना पाहून नेटकऱ्यांनी विविध मजेशीर सूचना सुरू केल्या आहेत.

‘तू आता उपान्त्य फेरी खेळून टाक,’ असं एकाने लिहिलं आहे. तर,

‘अंतिम फेरीसाठी सज्ज होताना जसप्रीत बुमराह’ अशी घोषणा एका बुमराह चाहत्याने करून टाकली आहे.

‘बाकीच्या संघातील फलंदाजांना हा व्हिडिओ पाहून धडकी भरली असेल,’ असं एकाने म्हटलं आहे.

‘इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी करताना बुमराह,’ असंही एकाने लिहिलं आहे.

(हेही वाचा – P. L. Deshpande Maharashtra Kala Academy च्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन २ मार्चला)

अलीकडेच बुमराहला आयसीसीचे चार पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयसीसी वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू, आयसीसी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, आयसीसी वार्षिक टी-२० संघ आणि आयसीसी वार्षिक कसोटी संघ असे हे पुरस्कार त्याला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्या हस्ते देण्यात आले. बुमराहचा तेज गोलंदाजीतील साथीदार मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारतीय संघात परतला आहे. आणि दुबईत पत्रकारांशी बोलताना बुमराहने (Jasprit Bumrah) याविषयी आनंद व्यक्त केला होता.

‘शमीविषयी मला खूप छान वाटतंय. दुखापतीमुळे त्याला मोठा फटका बसला. वर्षभर तो क्रिकेटपासून दूर होता. अशा गोष्टींचा सामना करणं खेळाडूसाठी कठीण असतं. पण, शमीने स्वत:ला सावरलं आणि तो पुनरागमन करत आहे. हेच खुप छान आहे,’ असं बुमराह म्हणाला होता.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता आयपीएल (IPL) आणि पुढे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळेल असा अंदाज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.