Jasprit Bumrah : भारत – पाक सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा आयसीसी पुरस्काराने गौरव

सामन्यापूर्वी बुमराहला चार आयसीसी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

42
Jasprit Bumrah : भारत - पाक सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा आयसीसी पुरस्काराने गौरव
Jasprit Bumrah : भारत - पाक सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा आयसीसी पुरस्काराने गौरव
  • ऋजुता लुकतुके

पाठदुखीमुळे स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) खेळत नाहीए. ऑस्ट्रेलियात असताना पाचव्या सिडनी कसोटीत त्याला ही दुखापत जडली. पण, भारत – पाक सामन्यात तरीही बुमराह (Jasprit Bumrah) ॲक्शनमध्ये होता. गेल्या वर्षभरातील कामगिरीसाठी त्याची चार आयसीसी (ICC) पुरस्कारांसाठी निवड झाली होती. आणि हे पुरस्कार त्याला सामन्यापूर्वी देण्यात आले. दुबईतच आयसीसीचं मुख्यालय आहे. आणि दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर सामना सुरू होण्यापूर्वी एका छोटेखानी कार्यक्रमात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jai Shah) यांच्या हस्ते बुमराहला (Jasprit Bumrah) हे पुरस्कार देण्यात आले.

आयसीसी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, आयसीसी वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू, तसंच आयसीसी सर्वोत्तम संघ आणि आयसीसी वर्षातील सर्वोत्तम टी-२० संघ असे पुरस्कार बुमराहने (Jasprit Bumrah) स्वीकारले.

(हेही वाचा – Champions Trophy 2025, Ind vs Pak : विराटने सांगितली धावांचा पाठलाग करतानाची त्याची भूमिका)

(हेही वाचा – Bhiwandi मध्ये वासनांध मुसलमान मोहम्मद सैदने साथीदारांसह मुलीवर केला सामूहिक बलात्कार)

२०२४ मधील बुमराहची कामगिरी अलौकिक अशीच आहे. कसोटींत त्याने फक्त १४.९२ धावांच्या सरासरीने ७१ बळी मिळवले आहेत. तर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातही बुमराहने (Jasprit Bumrah) स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. या स्पर्धेत त्याने १५ बळी मिळवले. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे टी-२० सारख्या प्रकारात षटकामागे ६ हून कमी धावा दिल्या. त्याची बळी मिळवण्याची सरासरी ८.२६ इतकी कमी होती. तर त्याने षटकामागे ४.१२ इतक्या कमी धावा अख्ख्या स्पर्धेत दिल्या.

२०२४ साली तो कसोटींत २०० बळी सगळ्यात कमी वेळेत पूर्ण करणारा गोलंदाजही ठरला. आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी आणि टी-२० संघांचाही तो भाग होता. त्यासाठी त्याला संघाची कॅप प्रदान करण्यात आली. दुबईत जसप्रीत बराच काळ भारतीय संघाबरोबर होता. आणि विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) त्याच्या बराच वेळ गप्पा रंगल्या. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हे टी-२० संघातील खेळाडूही भारत – पाक सामना पाहण्यासाठी हजर होते. याशिवाय दक्षिणेचा सुपरस्टार चिरंजीवीही सामना पाहण्यासाठी हजर होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.