- ऋजुता लुकतुके
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय टी-२० संघ सध्या स्थित्यंतराच्या स्थितीतून जात आहे. अशावेळी निवड समिती आणि नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) विश्वास टाकला आहे. देशाचा नंबर वन तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) यापूर्वी आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे. तो गोलंदाजांचा कर्णधार म्हणूनही संघ प्रशासनात काम पाहतो. अशावेळी तुला कप्तान व्हायला आवडलं असतं का, या प्रश्नाचं बुमराने मजेशीर उत्तर दिलं आहे.
‘मला कप्तान करा असं म्हणणं हे माझ्या आताच्या पगारापेक्षा खूप जास्त बोलण्यासारखं आहे,’ असं म्हणत बुमरा मनमोकळं हसला. पण, त्याचवेळी गोलंदाज संघाचं नेतृत्व उत्तमप्रकारे करू शकतात, असं सांगायलाही तो विसरला नाही. (Jasprit Bumrah)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : भारतीय संघासाठी महत्त्वाची ऑलिम्पिक आकडेवारी)
जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) संभाव्य कर्णधारांच्या यादीत तसंही कधी नाव नव्हतं. कर्णधार म्हणून त्याच्या नावाची चर्चाही नव्हती. कप्तानी विषयीची आपली मतं तरीही त्याने इंडियन एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मोकळेपणाने व्यक्त केली आहेत. ‘मी संघाला जाऊन असं म्हणू शकत नाही की, मला कर्णधार करा. ते माझ्या बाहेरचं आहे. पण, गोलंदाज हे हुशार क्रिकेटपटू असतात. त्यांना फलंदाजाला चकवून बाद करायचं असतं. मैदानं लहान होत चालली आहेत. आणि फलंदाजांकडे अद्यायवत बॅट आल्यात. अशावेळी बळी मिळवण्यासाठी गोलंदाजाला मेहनत आणि हुशारी वापरावी लागत आहे,’ असं बुमरा म्हणाला.
सामना हरल्यावर गोलंदाजांकडे बोट दाखवलं जातं. पण, आम्ही अशावेळी बॅटच्या मागे किंवा खेळपट्टीच्या खाली लपून बसत नाही. आम्ही आव्हानांना सामोरं जातो, असं बुमरा म्हणाला. तर गोलंदाज चांगला कर्णधार होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचं नाव घेतलं. (Jasprit Bumrah)
(हेही वाचा- Jammu and Kashmirच्या कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला, ३ जवान जखमी)
‘पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषकातही जिंकून दिलं. यापूर्वी वसिम अक्रम, वकार युनुस, कपिल देव आणि इमरान खान यांनीही अशी अलौकिक कामगिरी केली आहे,’ असं शेवटी बुमरा म्हणाला. जसप्रीत बुमराहला श्रीलंका दौऱ्यातून टी-२० तसंच एकदिवसीय मालिकेतही विश्रांती देण्यात आली आहे. (Jasprit Bumrah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community