स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दुखापतीनंतर तब्बल ११ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करतांना आता इतर सर्व सामने खेळण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्याने दाखवून दिले.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने २० ओव्हरमध्ये १३९ धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तर देताना भारताने ६.५ ओव्हरमध्ये ४७ धावा केल्या. मात्र त्यानंतर पाऊस आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे.
आयर्लंड आणि भारत (Jasprit Bumrah) यांच्यातील पहिला टी20 सामना डब्लिन येथे १८ ऑगस्ट रोजी खेळला गेला. आयर्लंडकडून विजयासाठी मिळालेल्या १४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६.५ षटकात २ बाद ४७ धावा केल्या होत्या, त्यावेळी पावसाचे जोरदार हजेरी लावली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याने २४ धावा तर ऋतुराज गायकवाड याने १९ धावा केल्या. तिलक वर्मा गोल्डन डकवर बाद झाला. तर संजू सॅमसन १ धाव करत नॉट आऊट राहिला.
(हेही वाचा – Rape Case : मंदिरातून घरी जाणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल)
प्रथम गोलंदाजी करताना, तब्बल ११ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बुमराहने (Jasprit Bumrah) भेदक गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने दोन विकेट काढल्या. तर रवी बिश्नोई आणि डेब्यू मॅन प्रसिद्ध कृष्णा याने देखील घातक मारा करत २ विकेट्स घेतल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community