- ऋजुता लुकतुके
श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत टी-२० आणि एकदिवसीय संघात शुभमन गिलची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. आता कसोटीतही तो ही भूमिका बजावेल असं खात्रीलायकरित्या समजतंय. त्यामुळे कसोटी संघाचा आधीचा उपकर्णधार जसप्रीत बुमराला ही जबाबदारी सोडावी लागणार आहे. भारतीय संघ आता स्थित्यंतरातून जातोय. रोहीत शर्मा ३७ वर्षांचा आहे. आणि येत्या १-२ वर्षांत तो निवृत्त होऊ शकतो. अशावेळी त्याचा वारसदार शोधण्याचा प्रयत्न बीसीसीआय आणि संघ प्रशासन करतंय. आणि त्यांची पसंती शुभमन गिलला दिसतेय. (Jasprit Bumrah)
सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकच कप्तान असावा अशी निवड समिती, बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची धारणा आहे. आणि शुभमन हे योग्य नाव त्यांना वाटतंय. श्रीलंके विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका झाली की, भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहे. तेव्हाच भारतीय संघातील हा बदल दिसून येईल अशी दाट शक्यता आहे. (Jasprit Bumrah)
(हेही वाचा – BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनवल्या कागदी पिशव्या)
भारतीय संघातच हा मोठा बदल
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी १९ सप्टेंबरला चेन्नई इथं होणार आहे. तर उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना २७ तारखेला नागपूर इथं होणार आहे. गिल हा सध्या भारतीय टी-२० आणि एकदिवसीय संघांचा उपकर्णधार आहे. जसप्रीत बुमराने अलीकडेच एका मुलाखतीत कर्णधार पदाविषयी आपली मतं व्यक्त केली होती. ‘मी संघाकडे जाऊन मला कप्तान करा, असं म्हणू शकत नाही. ते माझ्या पगारापेक्षा जास्त बोलल्यासारखं होईल. पण, गोलंदाज चांगले कर्णधार होऊ शकतात,’ असं बुमरा म्हणाला होता. (Jasprit Bumrah)
पण, आता भारतीय संघातच हा मोठा बदल होऊ घातला आहे. कसोटी संघाचं उपकर्णधार पद त्याच्याकडून जाऊ शकतं. बुमरावर भारतीय संघातील गोलंदाजांचं नेतृत्व मात्र आधीपासूनच देण्यात आलंय. गोलंदाजांना सांभाळून घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं ही त्याची जबाबदारी आहे. (Jasprit Bumrah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community