Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह महिन्यातील आयसीसी सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी

Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुमराहने ५ कसोटींत ३२ बळी घेतले होते.

24
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह महिन्यातील आयसीसी सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) डिसेंबर महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुरेख कामगिरीमुळे बुमराहला हा मान मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातील ३ कसोटींत बुमराहने २२ बळी मिळवले होते आणि त्यासाठी त्याची सरासरी होती अवघी १४ धावांची. या कामगिरीच्या जोरावर पॅट कमिन्स आणि डेन पीटरसन या स्पर्धकांना मागे टाकत बुमराहने हा पुरस्कार जिंकला आहे.

भारतीय संघाने यंदा बोर्डर-गावस्कर मालिका १-३ ने गमावली. पण, बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अव्वल झाली आणि मोठ्या फरकाने मालिका गमावूनही बुमराह (Jasprit Bumrah) मालिकावीरही ठरला. मालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या कसोटींत त्याने संघाचं नेतृत्वही केलं आणि पहिली पर्थ कसोटी भारताने २९५ धावांनी जिंकलीही. डिसेंबर महिन्यातील पहिली कसोटी झाली ती ॲडलेडमध्ये आणि दिवस-रात्र चाललेल्या कसोटीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्या डावांत ४ आणि दुसऱ्या डावांत ६ बळी मिळवले. तर ब्रिस्बेनमध्येही त्याने एकूण ९ बळी टिपले.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर मंत्री झाले असते, तर….; सावरकरांचा उल्लेख, दाऊदचा दाखला, Vinod Tawde यांची शरद पवारांवर कडवी टीका)

ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत फॉलोऑन वाचवण्यातही बुमराहने (Jasprit Bumrah) मोठी भूमिका बजावली. त्याने नाबाद ७ धावा केल्या असल्या तरी आकाशदीपला खमकी साथ दिली आणि त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. तर मेलबर्न कसोटीत बुमराहने (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा ९ बळी मिळवले. या मलिकेत बुमराहला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळत नसताना त्याने एकहाती किल्ला लढवला.

या मालिकेदरम्यान बुमराहने (Jasprit Bumrah) आंतरराष्ट्रीय कसोटींतील २०० बळींचा टप्पाही सर केला आहे आणि हे करताना त्याची सरासरी ही २० धावांच्या आतली आहे. ही अद्वितीय कामगिरी मानली जात आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीही त्याच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. अख्ख्या मालिकेत त्याने १५१ षटकं टाकली. पण, त्यामुळे सिडनी कसोटींत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीत उसण भरली आहे आणि सध्या तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.