ब्रॉडला बुमराहमध्ये दिसला युवराज: बुमराहच्या विक्रमाने ब्रॉडच्या डोळ्यासमोर तारे चमकले

गोलंदाजीमध्ये आजवर बुम बूम बुमराहने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे. त्याच जसप्रितने आता फलंदाजीतही चमक दाखवण्यास सुरुवात केली आहे. कधी एकेकाळी आपल्यावर फलंदाजीची वेळच येऊ नये म्हणून पॅव्हेलियनमध्ये बसून देवाला साकडे घालणारा जसप्रित बुमराह इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ब्रॉड याच्यासाठी कर्दनकाळ ठरला आहे.

या टेस्टचा कर्णधार जसप्रितने ब्रॉडच्या एकाच षटकात तब्बल ३५ धावा कुटल्या. विशेष म्हणजे भारताच्या युवराज सिंहने टी-२०मध्ये सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकत ३६ धावा केल्या होत्या. परंतु जसप्रितने ही किमया जिथे संथगतीने फलंदाजी केली जाते, अशा कसोटी सामन्यात साधली आहे. युवराजने ज्या गोलंदाजाची धुलाई केली होती, त्याच गोलंदाजाची धुलाई करत बुमराहने एकाच षटकात ३५ धावा करत वेस्ट इंडिजच्या लाराचाही विक्रम मोडला. कसोटीतील एकाच षटकात ३५ धावा कुटणारा बुमराह हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

(हेही वाचाः 500 च्या ‘या’ नोटा आहेत खोट्या? केंद्र सरकारचा मोठा खुलासा)

भारताचा डाव सावरला

भारत आणि इंग्लंड दरम्यान एजबेस्टन येथे कसोटी सामना सुरु असून, पहिल्या डावामध्ये भारताची अवस्था पाच बाद ९८ अशी होती. परंतु त्यानंतर मैदानावर उतरलेल्या पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी सामन्याची सूत्रे हाती घेत तब्बल द्विशतकी भागीदारी रचत संघाची धावसंख्या तिनशेपार केली. पाच बाद ९८ अशी अवस्था असताना भारताचा संपूर्ण डाव ४१६ धावांमध्ये संपुष्टात आला. पंत यांनी १११ चेंडूत १४६ धावा आणि रवींद्र जडेजाने १९४ चेंडूत १०४ धावा केल्या. भारताची धावसंख्या ३७५ असताना रवींद्र जडेजा बाद झाला आणि कर्णधार जसप्रित बुमराह फलंदाजीला उतरला.

बुमराहने केले गुमराह

मात्र, ब्रॉड यांच्या एका षटकात पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने आपले मनसुबे स्पष्ट केले. त्यानंतर वाईड बॉलवर चार धावा निघाल्या आणि पुढील नो बॉलवर तर षटकार ठोकला. पुढील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग तीन चौकार ठोकतानाच सातव्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला. परंतु शेवटचा चेंडू ब्रॉडने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, तो चेंडू सावधपणे खेळत बुमराहने चोरटी धाव घेतली. त्यानंतर एका षटकात तब्बल ३५ धावा निघाल्या. मात्र, वाईड बॉलवरील चार धावा वगळता बुमराहने ३१ धावा केल्या. १६ चेंडूत ३१ धावा करत बुमराह नाबाद राहिला.

(हेही वाचाः श्रीगणेशोत्सवाकरीता कोकणात जाण्यासाठी ७४ विशेष ट्रेन्स)

असा झाला विक्रम

एका षटकात ३५ धावा करणाऱ्या बुमराहने ब्रायन लाराचाही रेकॉर्ड तोडला. बुमराहच्या बॅटमधून ३१ धावा निघाल्या असल्या तरी यापूर्वी लारा आणि जी.जे. बेअली यांना एका षटकात प्रत्येकी २८ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे कसोटीत एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर नोंदवला गेला असून, यापूर्वी हा विक्रम लाराच्या नावावर नोंदवला गेला होता.

कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा ठोकणारे फलंदाज

  1. जसप्रित बुमराह, भारत (३५ धावा) भारत विरुध्द इंग्लंड
  2. ब्रायन लारा, वेस्ट इंडिज(२८धावा) वेस्ट इंडिय विरुध्द दक्षिण आफ्रिका
  3. जीजे बेअली, ऑस्टेलिया(२८ धावा) ऑस्टेलिया विरुध्द इंग्लंड
  4. के ए महाराज, दक्षिण आफ्रिका (२८धावा) दक्षिण आफ्रिका विरुध्द इंग्लंड

(हेही वाचाः बाळासाहेबांच्या स्मारकावर आजवर झाला ५० कोटींचा खर्च)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here