-
ऋजुता लुकतुके
नुकत्याच आटोपलेल्या मेलबर्न कसोटीत भारताचा मानहानीकारक पराभव झाला. आणि मालिकेही संघ आता १-२ असा पिछाडीवर पडला आहे. पण, नितीश कुमार रेड्डीने आपलं पहिलं वहिलं कसोटी शतक याच मैदानावर ठोकलं. तर जसप्रीत बुमराहनेही कसोटीतील २०० बळींचा मापदंड ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सर केला. त्याचा गौरव म्हणून या मैदानातील फलकावर दोघांचं नाव दिमाखात कोरलं गेलं आहे. (Jasprit Bumrah, Nitish Reddy @MCG)
जसप्रीत बुमराहने या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ९ बळी मिळवले. तर २०० बळी पूर्ण करताना सगळ्यात कमी सरासरी राखणारा तो खेळाडू आहे. बुमराने ८,४८४ चेंडूंत २०० कसोटी बळी पूर्ण केले. या बाबतीत तो वकार युनूस (७,७२५), डेल स्टेन (७,८४८) आणि कासिगो रबाडा (८,१५३) या तिघांच्या मागे आहे. पण, या चौघांतही बुमराहची सरासरी सगळ्यात कमी म्हणजे १९.४२ इतकं आहे. २०० बळी मिळवणाऱ्या जगातील सर्व गोलंदाजांमध्ये बुमराहची सरासरी सगळ्यात कमी आहे. (Jasprit Bumrah, Nitish Reddy @MCG)
(हेही वाचा- Rohit Sharma : रोहित शर्माचा सरत्या वर्षाला निरोप देणारा व्हीडिओ व्हायरल )
एकूणच २०२४ सालात बुमराहने १४.९२ च्या सरासरीने ७१ बळी मिळवले आहेत. ७० पेक्षा जास्त बळी एका वर्षांत मिळवणारा तो १६ वर्षांतील पहिला गोलंदाज आहे. बुमराहच्या बरोबरीने या कसोटीत भारताकडून नितीश रेड्डी चमकला. नितीशने कसोटीतील आपलं पहिलं शतक झळकावताना पहिल्या डावांत भारताचा फॉलो ऑन तर टाळलाच. शिवाय भारताला ऑस्ट्रेलियन धावसंख्येच्या जवळ नेलं. या मापदंडांमुळे नितीश आणि बुमराह यांची नावं मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या फलकावर कायमची कोरली गेली आहेत. (Jasprit Bumrah, Nitish Reddy @MCG)
Magnificent 5️⃣-wicket haul 🤝 Special Maiden 💯
Vice Captain Jasprit Bumrah and Nitish Kumar Reddy’s names are etched on the Honours Board of Melbourne Cricket Ground ✍️ 👏#TeamIndia | #AUSvIND | @Jaspritbumrah93 | @NKReddy07 pic.twitter.com/4tat5F0N6e
— BCCI (@BCCI) December 31, 2024
नितीश रेड्डीने या मालिकेत भारतीय संघात पदार्पण केलं ते अष्टपैलू फलंदाज म्हणून. आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. ४८, ३८, ४२, ४२, १६, ११३ आणि १ अशा त्याच्या या मालिकेतील धावा आहेत. याशिवाय मालिकेत त्याने ३ बळीही मिळवले आहेत. (Jasprit Bumrah, Nitish Reddy @MCG)
(हेही वाचा- Shiv Sena UBT कडून Rashmi Shukla यांचे Walmik Karad च्या शरणागतीबद्दल अभिनंदन!)
बोर्डर – गावसकर चषकात मेलबर्न कसोटी भारताने १८४ धावांनी गमावली. आता चषक राखायचा असेल तर भारताला अखेरची सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीनेही भारताला मालिकेत बरोबरी राखणं अत्यावश्यक आहे. (Jasprit Bumrah, Nitish Reddy @MCG)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community