-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकातून अखेर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. स्पर्धेसाठी संघात बदल करायचे असल्यास ती मुदत दुबईच्या स्थानिक वेळेनुसार ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत होती. आणि बीसीसीआयने त्याच्या काही मिनिटं आधी संघातील हा बदल जाहीर केला आहे. ‘पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याची जागा आता हर्षित राणा घेईल,’ अशा दोन वाक्यांमध्ये बीसीसीआयने हा महत्त्वाचा अपडेट दिला आहे. संघात आणखी एक बदल झाला आहे. तो म्हणजे यशस्वी जयसवालच्या ऐवजी वरुण चक्रवर्ती संघात आला आहे. हा बदलही आश्चर्यकारकच म्हणावा लागेल. कारण, पूर्ण वेळच्या फिरकीपटूने एका पूर्णवेळ फलंदाजाची जागा घेतली आहे. (Jasprit Bumrah Ruled Out)
(हेही वाचा- जिल्हा आढावा बैठकीस फक्त मंत्र्यांना आमंत्रण; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची माहिती)
त्यामुळे भारतीय संघात आता पाच फिरकीपटू असतील. कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीला आता वरुण चक्रवर्तीची भर पडली आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत चक्रवर्तीचा समावेश झाला तेव्हाच कर्णधार रोहित शर्माने तो चॅम्पियन्स करंडकाच्या संघातही येऊ शकतो, असं सुतोवाच केलं होतं. पण, तेव्हा कुलदीप यादव संघातून बाहेर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, निवड समितीने दुबईतील धिम्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन संघात पाच फिरकीपटूंचा समावेश केला आहे. याचा दुसरा अर्थ संघात तीन किंवा चार फिरकीपटूही खेळू शकतात. (Jasprit Bumrah Ruled Out)
🚨 NEWS 🚨
Fast bowler Jasprit Bumrah has been ruled out of the 2025 ICC Champions Trophy due to a lower back injury. Harshit Rana named replacement.
Other squad updates 🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy https://t.co/RML5I79gKL
— BCCI (@BCCI) February 11, 2025
यशस्वी जयसवाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे हे या संघातील राखीव खेळाडू असतील. ते दुबईला जाणार नाहीत. पण, ऐनवेळी गरज पडल्यास या तिघांना तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीदरम्यान दुसऱ्या डावांत पाठीची दुखापत जडली होती. त्यानंतर भारतात सुरुवातीचे ४-५ आठवडे तो बेडरेस्टवर होता. त्यानंतर बंगळुरूला क्रिकेट अकादमीत तो दाखल झाला. तिथे एमआरआय स्कॅननंतर बुमरा वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहे. पण, गोलंदाजीचा भार वाहण्यासाठी समर्थ नाही, असा निर्वाळा वैद्यकीय चमूने दिल्याचं समजतंय. बीसीसीआयने ११ फेब्रुवारीपर्यंत बुमरासाठी वाट पाहिली. ‘बुमरा खेळण्याची १० टक्के जरी शक्यता असेल तर बीसीसीआयची थांबण्याची तयारी आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं होतं. पण, अखेर हा कटू निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला आहे. (Jasprit Bumrah Ruled Out)
(हेही वाचा- BMC: मुंबईत मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमाची प्रगती धिम्यागतीने )
चॅम्पियन्स करंडकासाठी भारताचा अंतिम संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शामी, कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती
हेही पहा-
Join Our WhatsApp Community