- ऋजुता लुकतुके
२०१४ हे वर्ष जसप्रीत बुमराहसाठी स्वप्नवत गेलं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अव्वल गोलंदाज म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केलं. त्याच्यावर कप्तानीची जबाबदारी आली तेव्हा तिथेही त्याने आपलं कसब दाखवून दिलं आणि गोलंदाजीत तर १३ कसोटींत १४.९२ च्या सरासरीने ७१ बळी मिळवत बुमराह जगात भारी ठरला. इंग्लंड विरुद्ध ४५ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. बुमराचं कामगिरीतील सातत्य वाखाणण्याजोगं ठरलं आहे आणि त्याचा बळी मिळवण्याचा स्ट्राईकरेट – ३०.१ – हा जगात सर्वोत्तम ठरला आहे. षटकामागे २.९२ धावा मोजत त्याने ही कामगिरी केली आहे हे विशेष. (Goodbye 2024)
बुमराह जगातील इतर तेज गोलंदाजांच्या किती पुढे आहे बघा. इंग्लंडचा गस ॲटकिनसन हा वर्षांत ५० बळींपेक्षा जास्त बळी मिळवणारा बुमराह व्यतिरिक्त एकमेव गोलंदाज आहे. तर भारताच्यात रविंद्र जाडेजाने १३ कसोटींत ४८ बळी मिळवले आहेत. जाडेजाने यावर्षी तीनदा डावांत ५ बळी मिळवण्याची किमया केली. तर कसोटीत १० बळी मिळवण्याची कामगिरी त्याने एकदा केली. इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीत जाडेजाने ४१ धावांत ५ बळी मिळवले. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. (Goodbye 2024)
(हेही वाचा – Thirty First Party : अपघात रोखण्यासाठी बार, पब आणि पार्टीच्या बाहेर पोलीस तैनात)
रवीचंद्रन अश्विननेही यावर्षी ११ कसोटींत ४७ बळी मिळवले आहेत. तर बुमराहचा सहकारी आणि ऑस्ट्रेलियात काहीसा निष्प्रभ ठरलेला मोहम्मद सिराजनेही यंदा १३ कसोटींत ३५ बळी मिळवले आहेत. कुलदीप यादवला ५ कसोटी खेळण्याची संधी मिळाली आणि यात त्याने २२ बळी मिळवले आहेत. (Goodbye 2024)
भारताचे यशस्वी ५ गोलंदाज पाहूया,
हेही पहा –
Join Our WhatsApp Community