Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स करंडक खेळणार की नाही, हे कधी समजणार?

Jasprit Bumrah : बुमराह एका वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.

43
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स करंडक खेळणार की नाही, हे कधी समजणार?
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकासाठीच्या संघात जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश झाला आहे. तोपर्यंत तो तंदुरुस्त होईल असा विश्वास निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघ निवड करताना बोलून दाखवला होता. पण, बुमराहची तंदुरुस्ती किंवा त्याला नेमकं काय झालंय हे त्यांनी सांगितलं नव्हतं. फक्त बुमराहच्या पाठीच्या स्नायूंना सूज आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तेव्हापासून बुमराहचे समस्त चाहते तो तंदुरुस्त होण्याची वाट बघत आहेत.

न्यूझीलंडमधील एक ऑर्थोपेडिक सर्जन रोवान स्काऊटेन यांना बुमराहचे आतापर्यंतचे अहवाल पाठवण्यात आले असून त्यांच्या सल्ल्यावरून आता पुढील उपाय केले जाणार असल्याचं समजतंय. गरज पडल्यास बुमराह (Jasprit Bumrah) न्यूझीलंडलाही जाणार आहे. तो वेळेत तंदुरुस्त होईल अशी अजूनही बीसीसीआयला आशा वाटते. अन्यथा बुमराहचा पर्याय म्हणून हर्षित राणालाही तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे.

(हेही वाचा – ST Corporation ला २५ हजार नव्या लालपरी बसेस; अर्थमंत्र्यांची तत्वतः मान्यता)

चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघ इंग्लंडबरोबर एकदिवसीय मालिका खेळणार आहे आणि या मालिकेसाठीही बुमराहची (Jasprit Bumrah) संघात निवड झाली आहे. पण, इथं हर्षित राणाही बदली खेळाडू म्हणून तयार ठेवण्यात आला आहे. किंबहुना, मालिकेतील पहिले १-२ सामने बुमराह खेळू शकणार नाही, असंच अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं होतं. त्यामुळे ही तयारी आहे. आता चॅम्पियन्स करंडकापूर्वी बुमरा तंदुरुस्त झाला नाही तर कदाचित हर्षित राणाचीच निवड त्याच्या जागी होऊ शकते.

दरम्यान, बुमराह (Jasprit Bumrah) सध्या घरीच विश्रांती घेत आहे. रविवारी कोल्डप्लेच्या अहमदाबाद मधील कन्सर्टला त्याने जातीने हजेरी लावली.

(हेही वाचा – जेपीसीने Waqf विधेयकाला दिली मंजुरी; किती केल्या आहेत सुधारणा?)

फक्त इतकंच नाही तर कोल्डप्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनने एक गाणंही बुमराहला (Jasprit Bumrah) समर्पित केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर लाखो प्रेक्षक जमले असताना बुमराहचं नाव ऐकल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मुंबईतील कन्सर्टमध्येही ख्रिस मार्टिनने बुमराहचा उल्लेख केला होता.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियातील मालिकेत पाचव्या कसोटीत जायबंदी झाला. कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजी केली नाही. त्याच्या पाठीचे स्नायू दुखावल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी २०२२ मध्ये बुमराहच्या दुखापतीवर न्यूझीलंडमध्ये स्काऊटेन यांनीच शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे बीसीसीआयचं वैद्यकीय पथक आताही त्यांचाच सल्ला घेत आहे. चॅम्पियन्स करंडकासाठी संघ बदल करण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी ही आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.