- ऋजुता लुकतुके
भारताचा आघाडीचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा त्याच्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीबरोबरच अचूकता आणि परिणामकारक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या तो जगातील सर्वोत्तम तेज गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे जगभरात चाहतेही आहेत. असाच एक चाहता आहे शेजारी देश पाकिस्तानमधील. हा तरुण मुलगा बुमराच्या शैलीची हुबेहूब नक्कल करतो. बुमराकडूनच गोलंदाजीची प्रेरणा मिळाल्याचंही हा मुलगा सांगतो. (Jasprit Bumrah)
रिझवानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Jasprit Bumrah)
Young bumrah vs Young Rizwan pic.twitter.com/AknB26lHUT
— Ahmed.. 🇵🇰🇵🇸 (@nwgenerationX) July 14, 2024
(हेही वाचा – Water Supply : मुंबईकरांना होणाऱ्या धरणातील पाणीसाठा मागील वर्षांपेक्षा अधिक)
गोलंदाजीच्या शैलीची हुबेहूब नक्कल या व्हिडिओत दिसते. सुरुवातीपासून ते चेंडू टाकताना आणि त्यानंतरची कृतीही अगदी हुबेहूब आहे. हा मुलगा अर्थातच, होतकरू युवा क्रिकेटपटूही आहे. पण, त्याचबरोबर या व्हिडिओमुळे बुमराचा तरुण मुलांवर असलेला प्रभावही अधोरेखित होत आहे. नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही जसप्रीत बुमरा चमकला आणि त्याने ९ सामन्यात १५ बळी मिळवत मालिकावीराचा किताब पटकावला होता. (Jasprit Bumrah)
विशेष म्हणजे त्याने षटकामागे फक्त ४.१७ धावा दिल्या. तसंच ८.२६ च्या सरासरीने गोलंदाजी केली. अचूकता आणि बळी मिळवण्याची परिणामकारकता यामुळे बुमरा भारतीय संघातील प्रमुख अस्त्र आहे. (Jasprit Bumrah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community