Jasprit Bumrah : हार्दिक पांड्याच्या पुनरागमनावर बुमराह नाराज ?

एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण

167
Jasprit Bumrah : हार्दिक पांड्याच्या पुनरागमनावर बुमराह नाराज ?

मागील दोन हंगाम गुजरात टायटन्स संघाकडून खेळल्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आता पुन्हा एकदा त्याची जुनी फ्रँचाईजी मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. मुंबई संघाने (Jasprit Bumrah) त्याला गुजरातकडून विकत घेतलं आहे. गुजरातकडून खेळताना हार्दिकने संघाच्या पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिलं होतं. तर गेल्यावर्षी ते उपविजेते ठरले होते. खुद्द हार्दिकने गुजरात टायटन्ससाठी ३१ सामन्यांत ८३१ धावा केल्या.

मात्र या हंगामासाठी हार्दिक (Hardik Pandya) पुन्हा एकदा मुंबई संघामध्ये परतला आहे. अशातच या सर्व घडामोडीवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला निमित्त ठरली आहे जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) एक पोस्ट.

(हेही वाचा – Shubman Gill : गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यावर शुभमनची पहिली प्रतिक्रिया )

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ‘गप्प राहणं कधी कधी चांगलं उत्तर असतं” अशा आशयाची त्याने पोस्ट केली आहे. त्यावरून क्रिकेट चाहत्यांनी अनेक वेगवेगळे तर्क लावले आहेत. त्यामधील एक तर्क म्हणजे हार्दिकच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्समध्ये नाराजी आहे.

मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य

रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कर्णधारपदाचा दावेदार होता. पण अचानक हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री झाल्याने बुमराह नाराज असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसंच मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य सुरु झाल्याचंही सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर बुमराहने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं असून लवकरच तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये जाणार असल्याचंही देखील बोललं जात आहे.

(हेही वाचा – Mumbra Blast : मुंब्र्यातील स्फोटातून संशयाचा धूर; स्फोट नक्की कसला? शोधण्यासाठी नमुने फॉरेन्सिक विभागाकडे)

वर्ल्ड कप पराभवानंतर ट्विट

दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचं दु:ख कमी करण्यासाठी बुमराहने हे ट्विट केल्याचीही चर्चा आहे. विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाच्या तब्बल 10 दिवसांनंतर बुमराहनेहे ट्विट केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. आता पोस्टवरुन बुमराहन निराश असल्याचा अंदाजही बांधला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.