यावर्षी ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या दरम्यान आशिया कप होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) याच्या तब्येतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जसप्रित बुमराह लवकरच टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे. बुमराह संघात पुनरागमनाची जोरदार तयारी करत आहेत. बुमराह सध्या सरावावर अधिक भर देत आहे. बुमरासह श्रेयस अय्यर देखील सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रॅक्टीस करतांना दिसत आहेत.
आशिया कप आधी टीम इंडियात ‘कमबॅक’?
माहितीनुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू आयर्लंड मालिकेत टीम इंडियाचा भाग होऊ शकतात. बुमराह आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मागील काही काळ टीम इंडियातून बाहेर आहेत. बुमराह पाठदुखीमुळे ग्रस्त होता, त्याच्यावर मार्च महिन्यामध्ये शस्त्रक्रिया पार पडली. तर श्रेयस अय्यरलाही पाठीच्या दुखण्यामुळे शस्रक्रिया करावी लागली होती. यामुळे तो आयपीएल आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलला मुकला होता.
Never easy, but always worth it 💪 pic.twitter.com/aJhz7jCsxQ
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) November 25, 2022
(हेही वाचा – AI : आता आपल्या भाषेतून शिका AI तेही मोफत; केंद्र सरकारची नवी मोहीम)
बुमराहचा गोलंदाजीच्या सरावावर भर
बुमराह (Jasprit Bumrah) आणि अय्यर सध्या तब्येतीकडे विशेष लक्ष देत असून सरावावर भर देत आहे. बुमराहने गेल्या महिन्यापासून पुन्हा गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. बुमराह नेटमध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत आहे. बुमराहला आशिया कपमधील टीम इंडियाचा भाग बनवण्याची भारतीय संघ व्यवस्थापन आणि सिलेक्टर यांची इच्छा आहे. त्यामुळेच तो पुढील महिन्यात होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होऊ शकतो. बुमराह आयर्लंड दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community