-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा एकमेव भरवशाचा खेळाडू आहे. गोलंदाजीत तर त्याची मदार एकट्या बुमराहवर आहे. कारण, मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) फॉर्म हरवलाय. आणि आकाशदीप परिणामकारक असला तरी त्याला म्हणावे तसे बळी मिळत नाहीत. त्यामुळेच मेलबर्नमध्ये रोहितने बुमराहला ९ वेगवेगळ्या स्पेलमध्ये वापरून त्याच्याकडून दीड दिवसांत २५ षटकं टाकून घेतली. पण, बुमराहने (Jasprit Bumrah) कर्णधाराला हवं ते दिलं. मालिकेत आतापर्यंत त्याने ३३ बळी मिळवले आहेत.
पहिल्या पर्थ कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहने संघाचं यशस्वी नेतृत्व केलं. ॲडलेडमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी बुमराहने गोलंदाजीत कर्तव्य चोख पार पाडलं. ब्रिस्बेनमध्ये फॉलो ऑन टाळण्याच्या बाबतीत संघाला गरज असताना तो आकाशदीपच्या बरोबरीने मैदानावर उभा राहिला. आणि पुन्हा एकदा मेलबर्नमध्ये प्रत्येक दिवशी त्याने गोलंदाजी केली. एकूण ९ बळीही मिळवले. संघाला जिथे जिथे गरज होती, तेव्हा एकदा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कंबर कसून उभा राहिला आहे. बुमराहची या मालिकेतील कामगिरी पाहूया,
या मालिकेत आतापर्यंत ४ कसोटींत बुमराहने (Jasprit Bumrah) १४१ षटकं टाकली आहेत. आणि यात ३८५ धावांमध्ये ३० बळी मिळवले आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी आहे अवधी १२.८० शिवाय एका षटकांत २.७२ इतकी कमी सरासरी त्याने राखली आहे. कुठल्याही गोलंदाजासाठी ही आकडेवारी म्हणजे एक करामत आहे. मेलबर्न कसोटीनंतर जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नावावर लागलेले विक्रम आणि सर केलेले नवीन मापदंड बघूया,
(हेही वाचा – Manipur मध्ये २ दहशतवाद्यांना अटक; मोठा शस्त्रसाठाही जप्त)
- बुमराहने मेलबर्न कसोटीदरम्यान कसोटीतील २०० बळी पूर्ण केले आहेत. ४४ कसोटींत त्याच्या नावावर आता २०३ बळी जमा आहेत. डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी त्याने १३ वेळा केली आहे.
- डावांत ५ बळी मिळवण्याच्या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या शोएब अख्तरला मागे टाकलं आहे. शोएबने कसोटींत अशी कामगिरी १२ वेळा केली होती. हा विक्रम बुमराहने मेलबर्नमध्ये मागे टाकला.
- मेलबर्न कसोटीत बुमराहने नॅथन लायनला बाद केलं तो त्याचा यंदाच्या मालिकेतील ३० वा बळी होता. आणि ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर अशी कामगिरी गेल्या ३० वर्षांत परदेशी गोलंदाजाने केलेली नाही. या मालिकेतील बुमराह हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे.
- बिशन सिंग बेदी यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात एखाद्या मालिकेत ३० पेक्षा जास्त बळी मिळवणारा बुमराह हा फक्त दुसरा भारतीय गोलंदाज आहे.
- १९९२-९३ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कर्टनी अँब्रोजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत ३२ बळी मिळवले होते. त्यानंतर बुमराहने पहिल्यांदा ३० बळींचा टप्पा ओलांडला आहे. आता अँब्रोजचा विक्रमही सिडनी कसोटीत तो मागे टाकू शकतो. म्हणजे एका ऑस्ट्रेलियातील मालिकेत सर्वाधिक बळी मिळवण्याचा मान त्याला मिळू शकतो.
- बुमराहचा बळी मिळवण्याचा स्ट्राईक रेट आहे २८.२ धावांचा. आणि बळींची सरासरी आहे १२.८३ या गोष्टींमुळे बुमराह तेज गोलंदाजांमध्ये विशेष ठरतो. एकट्या रिचर्ड हॅडली यांनी ऑस्ट्रेलियात १२.१५ धावांची सरासरी राखली होती. २० पेक्षा जास्त बळी मिळवणाऱ्यांमध्ये सरासरीच्या बाबतीत सध्या हॅडलीच पुढे आहेत. सिडनीत बुमराह त्यांनाही मागे टाकू शकतो.
- २०२४ मध्ये जसप्रीत बुमराहने ७१ कसोटी बळी मिळवले आहेत. एका वर्षांत ७० पेक्षा जास्त बळी मिळवण्याची कामगिरी १६ वर्षांत इतर कुणीही केलेली नाही. त्यामुळेही तो उठून दिसतो.
या कामगिरीमुळेच जसप्रीत बुमराहला आयसीसी सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम कसोटी गोलंदाज अशी दोन महत्त्वाची नामांकनं मिळाली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community