आशिया आणि विश्व चषकाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. याला कारणीभूत पाकिस्तानचा एक माजी क्रिकेटपटू आहे. यावेळच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, तर यंदाचा विश्व चषक भारतात होणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भारताची टीम आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले. पाकिस्तान मात्र भारतात खेळण्यासाठी येणार असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने गरळ ओकली.
(हेही वाचा IPL 2023 : ‘तो’ लिलावात राहिला अनसोल्ड, सामन्यात त्याने दाखवून दिली आपली किंमत! कोण आहे हा खेळाडू?)
काय म्हणाला जावेद मियाँदाद?
मियाँदादने नादिर अलीच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितले की, भारतीय संघाने सुरक्षा विसरून जावी, मृत्यू यायचा तेव्हा येतोच. आयुष्य आणि मृत्यू अल्लाच्या हातात आहे. जर भारताने आज पाकिस्तानला बोलवले, तर आम्ही जाऊ;.पण भारतानेही पाकिस्तानात यायला हवे. मागच्या वेळेला आम्ही भारतात आलेलो, तेव्हा ते पाकिस्तानात आले नव्हते. आता त्यांनी पाकिस्तानात यावे. अशा प्रकारचे असवंदेनशील वक्तव्य मियाँदादने केले. तसेच पाकचा माजी कर्णधार इम्रान खानने बीसीसीआयला अहंकारी म्हटले आहे. २००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा संघ पाकिस्तानमध्ये गेला नाही. आशिया आणि विश्व चषकामध्येच दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात. २०१२-१३ मध्ये उभय संघात शेवटची द्वीपक्षीय मालिका झालेली.
Join Our WhatsApp Community