-
ऋजुता लुकतुके
आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शाह (Jay Shah) यांची वाटचाल आणखी सोपी झाली आहे. दोन दिग्गज क्रिकेट मंडळांनी त्यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांचा कार्यकाळ संपत आहे आणि काल ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्याचवेळी जय शाह यांनी अजून अर्ज दाखल केला नसला तरी त्यांच्या नावावची जोरदार चर्चा सुरू आहे.
(हेही वाचा- विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून Raj Thackeray यांची घोषणा)
ग्रेग बार्कले हे नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा या पदावर निवडून आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले (Greg Barclay) लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ६ ते ७ दिवसांत आयसीसीचा नवीन अध्यक्ष कोण होतो, किंवा त्यासाठी निवडणूक होते का, हे स्पष्ट होईल. (Jay Shah)
त्यातच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शाह यांच्याच नावाला पाठिंबा दिला आहे. या दोन दिग्गज क्रिकेट मंडळांच्या पाठिंब्यानंतर जय शाह (Jay Shah) यांचंच पारडं जड मानलं जात आहे.
JAY SHAH TO TAKE OVER AS NEW ICC CHAIRMAN…!!! 🇮🇳
– Australia and England supported Jay Shah to run the ICC for at least 3 years. (The Age). pic.twitter.com/X6rPkCMQ2z
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 21, 2024
जय शाहने (Jay Shah) २००९ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट प्रशासक झाले. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर २०१५ साली जय शाह बीसीसीआयमध्ये (BCCI) सहभागी झाले आणि सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.
(हेही वाचा- शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा अहिल्याबाईंनी चालवला; Raviraj Paradkar यांचे प्रतिपादन)
जय शाह (Jay Shah) वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर ३ वर्षे राहतील.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community