-
ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांची भेट घेतली. येत्या ३० जानेवारीला ऑलिम्पिक समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आणि त्यापूर्वी शाह स्वीत्झर्लंडमध्ये ल्युसानला मुद्दाम आले आहेत. २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश आहे. आता तो कायमस्वरुपी राहावा असा आयसीसीचा प्रयत्न असेल. त्या दृष्टीनेच ही भेट आयोजित करण्यात आली होती. आणि आयसीसीने त्यानंतर एक ट्विट करून त्याविषयी माहिती दिली आहे. (Jay Shah Meets Thomas Bach)
(हेही वाचा- Mahabaleshwar Temple : महाबळेश्वरमधील या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट दिली आहे का ?)
‘ऑलिम्पिकमध्ये लॉस एंजलीसच्या नंतरही क्रिकेटचा समावेश होत राहवा यासाठी जागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असं आयसीसीने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Jay Shah Meets Thomas Bach)
Momentum continues to build around cricket’s inclusion as an @Olympics sport at the @LA2028 Games and beyond, with @JayShah meeting International Olympic Committee (IOC) President Thomas Bach in Lausanne, Switzerland this week. pic.twitter.com/hiySGMGNPg
— ICC (@ICC) January 21, 2025
२०२८ च्या ऑलिम्पिकनंतर त्यापुढील ऑलिम्पिक २०३२ मध्ये ब्रिस्बेन इथं होणार आहे. आणि त्यामध्ये क्रिकेटचा समावेश असावा यासाठी शाह यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आयसीसीकडून गेल्या महिन्यातच तसा प्रस्ताव ब्रिस्बेन ऑलिम्पिक आयोजन समितीकडे गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या ब्रिस्बेन कसोटीत शाह यांनी शहरात महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. बीसीसीआयचे सचिव असतानाही शाह यांनी २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश असावा यासाठी निर्णायक प्रयत्न केले होते. (Jay Shah Meets Thomas Bach)
(हेही वाचा- Municipalities Election 2025 : महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर ?)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतही सध्या मोठा बदल घडत आहे. अध्यक्ष थॉमस बाख यांचा कार्यकाल यावर्षी संपत आहे. आणि आगामी ३० तारखेच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांचा भावी वारसदार निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी सदस्यांसमोर सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर काही महिन्यांत नवीन अध्यक्ष निवडला जाईल. आणि ती प्रक्रिया झाल्यावरच ऑलिम्पिक संविधानात बदल होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. कारण, क्रिकेटच्या कायमस्वरुपी समावेशासाठी ते आवश्यक आहे. पण, त्यासाठीची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे. (Jay Shah Meets Thomas Bach)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community