Jay Shah New ICC President ? जय शाह खरंच आयसीसीचे नवीन अध्यक्ष होणार?

Jay Shah New ICC President ? आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ लवकरच संपतो आहे.

133
Jay Shah New ICC President ? जय शाह खरंच आयसीसीचे नवीन अध्यक्ष होणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताचे क्रिकेट प्रशासक आणि सध्या बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह (Jay Shah) लवकरच नवीन भूमिकेत पहायला मिळू शकतात. आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपल्यावर त्यांच्याजागी जय शाह अध्यक्ष होतील अशी जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. बार्कले यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. आणि आणखी मुदतवाढीसाठी ते उत्सुक नाहीत, असं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी नवीन उमेदवाराचा शोध लवकरच सुरू होणार आहे. आयसीसी अध्यक्षाची नेमणूक ही सदस्य देश आणि कार्यकारिणी सदस्यांच्या मतदानाने होते. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाक बोर्ड चॅम्पियन्स करंडकाच्या तारखा बदलणार?)

ग्रेग बार्कले हे नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा या पदावर निवडून आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत, असं सांगण्यात येत आहे. जय शाह (Jay Shah) यांनी २०१९ मध्ये बीसीसीआय सचिव म्हणून पदभार स्वीकारला आणि २०२५ मध्ये त्यांना या पदावर ६ वर्षे पूर्ण होतील. जय शाह हे सध्या आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे शहा यांचे सर्व १६ मतदान सदस्यांशी चांगले संबंध आहेत.

(हेही वाचा – ‘The Diary of West Bengal’ चित्रपटाने मांडले पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भीषण दुःस्थितीचे वास्तव)

जय शाह (Jay Shah) वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती तीन वेळा अध्यक्ष होऊ शकत होती आणि प्रत्येक कार्यकाळ २ वर्षांसाठी होता. परंतु नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. जय शाह (Jay Shah) आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर ३ वर्षे राहतील. जय शाहने २००९ मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर २०१५ साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले. (Jay Shah New ICC President ?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.