Jemima Rodrigues : महिला क्रिकेटपटू जेमायमाह रॉड्रिगेस वडिलांमुळे अडचणीत; या क्लबने रद्द केलं सदस्यत्व

Jemima Rodrigues : जेमिमाचे वडील क्लबमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि ते ही धर्मांतराचे भरवत असल्याचा ठपका

28
Jemima Rodrigues : महिला क्रिकेटपटू जेमायमाह रॉड्रिगेस वडिलांमुळे अडचणीत; या क्लबने रद्द केलं सदस्यत्व
Jemima Rodrigues : महिला क्रिकेटपटू जेमायमाह रॉड्रिगेस वडिलांमुळे अडचणीत; या क्लबने रद्द केलं सदस्यत्व
  • ऋजुता लुकतुके 

अलीकडेच झालेल्या महिला टी-२० स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं. आघाडीची फलंदाज जेमायमाह रॉड्रिगेसचं अपयश यात उठून दिसलं होतं. तिला ४ सामन्यांत एकदाही २५ धावांही करता आल्या नाहीत. तिच्या धावा होत्या अनुक्रमे १३,२३, १६ आणि पुन्हा एकदा सोळा. चांगल्या सुरुवातीचा फायदा ती उचलू शकली नाही. त्यानंतर आता मायदेशात ती वडिलांमुळे अडचणीत सापडली आहे. मुंबईतील एक जुना जिमखाना असलेल्या खार जिमखान्याने तिला दिलेलं मानद सदस्यत्व रद्द केलं आहे. जेमायमाहचे वडील इव्हान रॉड्रिगेस यांनी गेल्या दीड महिन्यात जिमखान्याच्या सभागृहात तब्बल ३५ धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर क्लबने ही कारवाई केली. या कार्यक्रमांचा उद्देश धर्मपरिवर्तनासाठी लोकांना उद्युक्त करणे हा होता, असा ठपकाही क्लबने ठेवला आहे. त्यामुळे जेमायमाहची अडचण वाढली आहे. (Jemima Rodrigues)

(हेही वाचा- ICC Test Ranking : सर्फराझ आणि रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप; रिषभने विराटलाही टाकलं नागे )

याप्रकरणी खार जिमखान्याने रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती. यामध्ये जेमायमाहचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी म्हणाले, “जेमायमाह रॉड्रिगेसला दिलेले तीन वर्षांचे मानद सदस्यत्व २० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार रद्द करण्यात आले.” (Jemima Rodrigues)

जेमायमाह रॉड्रिगेसने २०१८ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. तिने आतापर्यंत ३ कसोटी, ३० एकदिवसीय आणि १०४ टी२० सामने खेळले आहेत. ३ कसोटीत तिने ५८.७५ च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत. या कालावधीत तिने ३ अर्धशतके झळकावली आहेत. जेमायमाहने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ अर्धशतकांच्या मदतीने ७१० धावा केल्या आहेत. तिचे सरासरी २७.३० आहे. जेमायमाहला सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तिने १०४ सामन्यात २९.७५ च्या सरासरीने आणि ११४.१७ च्या स्ट्राईक रेटने २१४२ धावा केल्या आहेत. जेमायमाहच्या नावावर ११ अर्धशतके आहेत. (Jemima Rodrigues)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.