- ऋजुता लुकतुके
गरजू मुलांना मदत करण्यासाठी, भारतीय फलंदाज के एल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी अलीकडेच एका धर्मादाय लिलावाचं आयोजन केलं होतं. भारतीय क्रिकेटपटूंची स्वाक्षरी असलेल्या वस्तू इथं लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यात विराट कोहलीने स्वाक्षरी केलेल्या जर्सीसाठी सर्वाधिक ४० लाख रुपयांची बोली लागली.
विप्ला फाउंडेशनसाठी ‘क्रिकेट फॉर चॅरिटी’ या नावाने हा लिलाव करण्यात आला. यामध्ये विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा आणि के एल राहुलसारख्या स्टार खेळाडूंच्या ऑटोग्राफ केलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावासाठी एकूण १.९३ कोटी रुपये जमा झाले. या पैशातून दिव्यांग मुलांच्या शिक्षणाचे काम केले जाणार आहे. (Jersey Signed by Virat Kohli)
(हेही वाचा – काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स Sharad Pawar यांना भाव देणार काय?)
या चॅरिटी लिलावात स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या वस्तू सर्वात महाग विकल्या गेल्या. त्याच्या स्वाक्षरी केलेल्या जर्सीशिवाय त्याच्या बॅटिंग ग्लोव्हजसाठी २८ लाख रुपयांची बोली लागली. याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॅट २४ लाख रुपयांना आणि बॅटिंग ग्लोव्हज ७.५ लाख रुपयांना विकले गेले.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या बॅटला १३ लाख रुपयांची बोली लागली, तर माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची बॅट ११ लाख रुपयांना विकली गेली. के एल राहुलची टेस्ट जर्सीही ११ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती. दरम्यान, राहुलच्या बॅटसाठी ७ लाख रुपये आणि हेल्मेटसाठी ४.२० लाख रुपयांची बोली लागली. (Jersey Signed by Virat Kohli)
(हेही वाचा – शिवसेना खासदार Naresh Mhaske यांनी राहुल गांधींकडे केली ‘ही’ मागणी)
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जर्सी ८ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. ऋषभ पंतच्या बॅटसाठी ७.५ लाख रुपये आणि यष्टीरक्षण ग्लोव्हजसाठी ३.५ लाख रुपयांची बोली लागली. तर अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनची कसोटी जर्सी ४.२० लाख रुपयांना विकली गेली.
एमएस धोनीचे ग्लोव्हज ३.५० लाख, श्रेयस अय्यरची बॅट २.८० लाख, रवींद्र जडेजाची जर्सी २.४० लाख, क्विंटन डी कॉकची जर्सी १.१० लाख, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहलची जर्सी ५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. या चॅरिटी लिलावाबाबत अथिया शेट्टी म्हणाली, विप्ला फाऊंडेशनला फायदा होण्यासाठी ‘क्रिकेट फॉर अ कॉज’ या आमच्या पहिल्या चॅरिटी लिलावाची घोषणा करताना मला आणि राहुलला आनंद होत आहे. तर राहुल म्हणाले, ‘या लिलावातून मिळालेल्या पैशांमुळे विप्ला फाउंडेशनच्या श्रवणदोष आणि बौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठीच्या विशेष शाळेला मदत मिळेल. माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेले हे काम आहे. (Jersey Signed by Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community